पुण्यात कामावरुन काढून टाकल्याचा राग, कर्मचाऱ्याचा कंपनीत गळफास
पुण्यातील हिंजवडी परिसरातील एमक्यूअर कंपनीमधील एका कामगाराने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केल आहे. सुंदर गोरटे असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरातील एमक्यूअर कंपनीमधील एका कामगाराने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कंपनी व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले यामुळे त्याने ही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुंदर गोरटे असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.
सुंदर गोरटे यांनी काल 11 वाजून 59 मिनिटांनी फेसबूकवर याबाबत पोस्ट करत व्यथा मांडली होती. “माझ्यावर दबाव आणून 23 आणि 24 तारखेला लिहून घेतले आणि मला एमक्युअर कंपनीतून काढले. मी त्यांना सांगितले होते की, मला कामावरुन काढलात तर मी जीव देईन. तरीही त्यांनी मला काढले. अशी पोस्ट गोरटे यांनी फेसबूकवर केली. तसेच या पोस्टच्या खाली त्यांनी अश्विनी मला माफ कर असेही लिहीले आहे.”
मात्र नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी नक्की आत्महत्या केली का याबाबत संशय व्यक्त केली का याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
गोरटे यांनी आत्महत्या केल्यानंतर हिंजवडी पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. दरम्यान गोरठे यांनी आत्महत्या का केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.