पुण्यात गॅस गिझरमधील वायूमुळे तरुणाचा गुदमरुन मृत्यू, बाथरुमचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर
गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे 30 वर्षीय तरुणाचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. रामराजे किशोर संकपाळ (वय 30) असे मृत्युमुखी (Pune Gas geyser leak) पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे : गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे 30 वर्षीय तरुणाचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. रामराजे किशोर संकपाळ (वय 30) असे मृत्युमुखी (Pune Gas geyser leak) पडलेल्या तरुणाचे नाव आहे. कोथरुड परिसरातील एका सोसायटीमध्ये बुधवारी हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा आणि बाथरुमचा दरवाजा तोडून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत कोथरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. (Pune Gas geyser leak)
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमधील वायूमुळे गुदमरुन मृत्यू होण्याचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईतीही एका तरुणीचा गिझरमधील गॅसमुळे बाथरुममध्येच गुदमरुन मृत्यू झाला होता. ध्रुवी गोहील असं 15 वर्षीय मुलीचं नाव होतं. ध्रुवी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी आंघोळीला जाते असं सांगून बाथरुममध्ये गेली. पण एक तास झाल्यावरही ध्रुवी बाथरुममधून बाहरे न आल्यामुळे घरातल्यांनी बाथरुमचा दरवाजा बाहरुन वाजवला. यावेळी दरवाजा तोडून पाहिल्यावर ध्रुवी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तसेच बाथरुममध्ये चार फूटापर्यंत काचेवर गॅस पसरलेला होता. ध्रुवीचा पायही गरम पाण्याने भाजला होता. ध्रुवीला तातडीने मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण 24 तासांनतर ध्रुवीचा मृत्यू झाला.
आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी सर्रास गॅस गिझर वापरले जातात मात्र, त्याच्या सुरक्षाविषयक नियमांकडे बहुधा दुर्लक्ष केलं जातं. याच नियमांकडे दुर्लक्ष केल्यानं अनेकांचे जीव गेले आहेत.
बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी असावी. बहुतेक ठिकाणी असते, मात्र, अनेकवेळा ती बंद केली जाते. त्यामुळे आतील वाफ बाहेर जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. यावर उपाय म्हणून बाहेरील हवा आत घेणारा आणि आतील हवा बाहेर सोडणारा एक्झॉस्ट फॅन बाथरूममध्ये बसवावा. जेणेकरुन हवा खेळती राहून, गॅसमुळे कोंडी होणार नाही.
गॅस गिझर वापरताना काय खबरदारी घ्यावी?
- गॅस गिझरचं फिटिंग प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करुन घ्यावी
- गॅस गिझरची जागा अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी असावी
- गॅस पुरवठ्यासाठी रबरी पाईपसोबत कॉपर फिटिंगही करावी
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन असावा किंवा किमान खिडकी उघडी ठेवावी.
संबंधित बातम्या
गिझरमधील गॅस लीक, वाढदिनीच बाथरुममध्ये गुदमरुन 15 वर्षीय मुलीचा मृत्यू