रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

"रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी कसे गाडीत फिरतात?" असा सवाल पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी विचारला आहे

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली
Follow us
| Updated on: Sep 08, 2020 | 8:36 AM

पुणे : कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने पुण्यातील मनसे नगरसेवकाचा संताप पाहायला मिळाला. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली. (Pune MNS Corporator Vasant More vandalizes car of Pune Municipal Corporation Official)

मोरे म्हणाले की, रुग्णालयातून मृतदेह नेण्यासाठी पालिकेच्या वाहन आगाराजवळ रुग्णवाहिका मागवण्यात आली होती, परंतु वारंवार फोन करुनही रुग्णवाहिका येण्यास साडेतीन तासापेक्षा जास्त कालावधी लागला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा फोडल्या.

“रुग्णांना रुग्णवाहिका मिळेना आणि तुम्ही अधिकारी कसे गाडीत फिरतात?” असा सवाल विचारात नियोजन न केल्यास एकाही अधिकाऱ्याला गाडीने फिरु देणार नाही, असा इशारा त्यांनी पुणे महापालिकेला दिला.

“आम्ही माणूस आहोत, कोरोना भयाण परिस्थितीत माणसांना जगवा. उपाययोजना द्या रे बाबांनो, हात जोडून खूप वेळा सांगितले. लोकप्रतिनिधी असून न्याय देऊ शकत नसू, तर आम्ही नालायक असू” अशा शब्दात त्यांनी हतबलता व्यक्त केली.

पुण्यातील मनसेच्या नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनीही हा व्हिडीओ शेअर करत पालिकेवर संताप व्यक्त केला आहे. (Pune MNS Corporator Vasant More vandalizes car of Pune Municipal Corporation Official)

कोरोना संसर्ग झाल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स आणि बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या निधनाचे वृत्त अवघ्या काही दिवसांपूर्वीचे आहे. त्यानंतर पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांचे निधन झाले, त्यांच्याबाबतही बेड मिळण्यास दिरंगाई झाल्याचे दिसले होते. दुर्दैव म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीतही जागा मिळत नव्हती.

संबंधित बातम्या :

अ‍ॅम्ब्युलन्स नाही, बेड नाही, पांडुरंगचा अखेरपर्यंत संघर्ष, आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडवणारा घटनाक्रम

पुणेकरांचा आवाज उठवणाराच कायमचा निघून गेला, पांडुरंग रायकरांसोबत काय-काय घडलं?

पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण

(Pune MNS Corporator Vasant More vandalizes car of Pune Municipal Corporation Official)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.