PMC Election Ward 13 Baner | बाणेर भागातील प्रभाग क्रमांक 13 वर भाजपाची सत्ता, यंदाही कमळ फुलणार का?

पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मधील एकूण लोकसंख्या 37,589 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 4147 एवढी आहे तर अनुसूचित जमातींची संख्या 650 एवढी आहे.

PMC Election Ward 13 Baner | बाणेर भागातील प्रभाग क्रमांक 13 वर भाजपाची सत्ता, यंदाही कमळ फुलणार का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 6:47 PM

पुणेः  राज्यातील पहिल्या टप्प्यातील महापालिका निवडणुकीचा (Municipal Corporation Election) बिगुल वाजला आहे. यात पुणे आणि पिपरी चिंचवड  महापालिकेचाही समावेश आहे. भाजपाच्या (BJP) ताब्यात असलेल्या पुणे महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी यंदा राष्ट्रवादीने (NCP) कंबर कसली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावतील. बदललेले प्रभाग, एकापेक्षा एक तुल्यबळ उमेदवार आणि पक्षांतर्गत कुरघोडी अशा स्थितीत पुण्याती महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये यंदा मोठी चुरस पहायला मिळेल. पुण्यातील बाणेर भागातील प्रभाग क्रमांक 13 मध्येही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी स्पर्धा रंगलेली दिसणार आहे. बाणेर येथील एरंडवणा, हॅपी कॉलनी भागातील चार वॉर्डांचा समावेश या प्रभागात होता. यंदा हा प्रभाग दोनच वॉर्डांमध्ये विभागला गेला आहे.. यापैकी एक खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षित आहे तर एक खुल्या गटासाठी निश्चित करण्यात आला आहे. भाजपाचं वर्चस्व असलेल्या या परिसरात यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शिरकाव करू शकते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल..

लोकसंख्येचं गणित काय?

पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 13 मधील एकूण लोकसंख्या 37,589 एवढी आहे. त्यापैकी अनुसूचित जातींची लोकसंख्या 4147 एवढी आहे तर अनुसूचित जमातींची संख्या 650 एवढी आहे.

वॉर्ड क्रमांक अ ची स्थिती काय?

एरंडवणा हॅपी कॉलनी परिसरात 2017 मधील निवडणुकीत भाजपाने सत्ता काबीज केली होती. या वॉर्डात भाजपचे दीपक पोटे यांनी शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारासमोर मोठी आघाडी घेत विजय संपादन केला होता. दीपक पोटे यांना मागील निवडणुकीत 20,468 मते मिळाली होती. तर मनसेचे अनिल राणे यांनी 5,228 मतं मिळवली. शिवसेनेचे अनिल माझिरे यांना 4,5096 मतांवर समाधान मानावं लागलं. यावर्षीच्या निवडणुकीत हा वॉर्डमध्ये भाजपचं कमळ फुलणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

2017 मधील मताधिक्य कसं?

– दीपक पोटे- भाजपा कमळ- 20468 – अनिल बाबुराव राणे- मनसे- 5228 अनिल माझिरे- शिवसेना-4596 प्रशांत वेलणकर – काँग्रेस- 1349 संजय छबू चव्हाण- राष्ट्रवादी काँग्रेस-2364 वैध मते- 35,546

उमेदवारपक्षविजयी/आघाडी
दीपक पोटे भाजपविजयी उमेदवार
अनिल बाबुराव राणेमनसे-
अनिल माझिरेशिवसेना-
प्रशांत वेलणकरकाँग्रेस- -
संजय छबू चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस-
अपक्ष, इतर--

वॉर्ड क्रमांक ब ची स्थिती काय?

बाणेर भागातील या परिसरातही 2017 मध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला होता. या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदाराविरोधात मोठी आघाडी घेतली होती. पाहुयात मताधिक्य- -माधुरी श्रीराम सहस्त्रबुद्धे- भाजप- 23,069 डॉ. प्रांजली थरकुंडे- शिवसेना- 4091 सुरेखा होले- मनसे- 2937 अनघा नाइक- राष्ट्रवादी काँग्रेस- 2719 सोनाली देविदास मगर- काँग्रेस- 1562 वैध मते- 35,546

उमेदवारपक्षविजयी/आघाडी
माधुरी श्रीराम सहस्त्रबुद्धेभाजपविजयी उमेदवार
डॉ. प्रांजली थरकुंडेशिवसेना-
सुरेखा होलेमनसे-
अनघा नाइक राष्ट्रवादी काँग्रेस-
सोनाली देविदास मगरकाँग्रेस-
अपक्ष-

वॉर्ड क्रमांक क ची स्थिती काय?

2017 मध्ये खुल्या गटातून या जागेवर उमेदवारांनी निवडणूक लढवली. भाजपच्या मंजुश्री खर्डेकर यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रभावती बोरकर यांच्यावर मोठा विजय म िळवला होता. पाहुयात त्या वेळचं मताधिक्य- मंजुश्री खर्डेकर- भाजपा- कमळ- 20,943 प्रभावती बोरकर- अपक्ष- 4017 अॅड लंदना विवेक कडू- काँग्रेस- 1439 अश्विनी किशोर कांबळे- राष्ट्रवादी काँग्रेस- 2717 आयुषी राजेश पळसकर- शिवसेना- 3455 पद्मजा हेमंत संभूस- मनसे- 1857

उमेदवारपक्षविजयी/आघाडी
मंजुश्री खर्डेकरभाजपाविजयी उमेदवार
प्रभावती बोरकरअपक्ष -
अॅड लंदना विवेक कडूकाँग्रेस-
अश्विनी किशोर कांबळेराष्ट्रवादी काँग्रेस-
आयुषी राजेश पळसकरशिवसेना-
पद्मजा हेमंत संभूसमनसे-

वॉर्ड क्रमांक ड

बाणेरमधील या वॉर्डातदेखील भाजपच्या नगरसेवकाची सत्ता आहे. इथे 2017 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चैतन्य मानकर यांचा पराभव करत भाजपचे जयंत भावे विजयी झाले होते. पाहुयात मताधिक्य- जयंत गोविंद भावे – भाजपा- 19891 चैतन्य अशोक मानकर- राष्ट्रवादी काँग्रेस- 3659 शिरीष गजानन आपटे- शिवसेना- 3082 मंदार चंद्रशेखर बलकवडे- मनसे- 3751 प्रकाश सोमनाथ कदम- अपक्ष- 176 शिवा मंत्री- काँग्रेस- 3477

उमेदवारपक्ष विजयी/आघाडी
जयंत गोविंद भावेभाजपा- विजयी उमेदवार
चैतन्य अशोक मानकरराष्ट्रवादी काँग्रेस
शिरीष गजानन आपटेशिवसेना
मंदार चंद्रशेखर बलकवडेमनसे
प्रकाश सोमनाथ कदमअपक्ष
शिवा मंत्रीकाँग्रेस-
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.