पुणेकरांचा संभ्रम मिटला, ‘या’ वेळेत सर्वांना पेट्रोल-डिझेल मिळणार

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यात सर्व नागरिकांना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल डिझेल देण्याचे स्पष्ट आदेश दिले (Pune Petrol Diesel For Everyone during Lockdown as well)

पुणेकरांचा संभ्रम मिटला, 'या' वेळेत सर्वांना पेट्रोल-डिझेल मिळणार
Petrol Price May Come Down
Follow us
| Updated on: May 06, 2020 | 3:43 PM

पुणे : पेट्रोल डिझेल विक्रीबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एक नवा आदेश काढला आहे. कंटेन्मेंट झोन वगळता पुण्यात इतरत्र सकाळी सात ते संध्याकाळी 7 या वेळेत सर्वांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा होणार आहे. (Pune Petrol Diesel For Everyone during Lockdown as well)

पुणे महानगरपालिका प्रशासनाने काल सामान्य नागरिकांनाही पेट्रोल आणि डिझेल देण्याची भूमिका घेतली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने इंधन केवळ अत्यावश्यक सेवा आणि प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांनाच मिळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पुणेकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यात सर्व नागरिकांना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल डिझेल देण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने संभ्रम मिटला आहे. विशेष म्हणजे गाडीत पेट्रोल डिझेल भरताना पास, ओळखपत्र दाखवण्याचीही आता गरज नाही. लॉकडाऊन कायम असल्याने नागरिकांनी घरातच राहायचे आहे, मात्र अत्यावश्यक काम असल्यास गाडीने बाहेर पडता येणार आहे.

काय आहेत आदेश?

पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे, खडकी आणि देहूरोड छावणी परिषद (कँटॉनमेंट), नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित भाग (कंटेन्मेंट झोन) वगळता सर्व क्षेत्रांमध्ये पेट्रोल-डिझेल पंपचालकांनी येणाऱ्या सर्व वाहनांना पास/ओळखपत्र याची मागणी न करता सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत पेट्रोल डिझेलचा पुरवठा करावा.

काल काय घडलं?

पुणे महानगरपालिका प्रशासनाने आधी सामान्य नागरिकांनाही पेट्रोल आणि डिझेल देण्याची भूमिका घेतली होती. या निर्णयानंतर शहरात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा लागल्या होत्या. इंधन भरण्यासाठी शहरात वाहनांची गर्दी वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने केवळ अत्यावश्यक सेवा आणि प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांनाच डिझेल आणि पेट्रोल मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. (Pune Petrol Diesel For Everyone during Lockdown as well)

हेही वाचा : भवानी पेठ, ढोले पाटील, शिवाजीनगर परिसराला कोरोनाचा विळखा, पुण्यात कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीत अत्यावश्यक आणि इतर वाहनांना देण्यात आलेले वाहतूक पास, सरकारी आणि निमसरकारी यंत्रणांनी दिलेले ओळखपत्र/पास ग्राह्य धरुन त्या वाहनांना इंधन पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते.

शेती, बांधकाम आणि इतर सवलत मिळालेल्या क्षेत्रातील सर्व प्रकारच्या वाहनांना देखील इंधन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या क्षेत्रातील वाहनांना इंधनाला नकार दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.