पुणे तिथे काय उणे… पुण्यात आंबे खाण्याची स्पर्धा

पुणे : आंबा हा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाचं आवडत फळ. उन्हाळ्याची सुरुवात झाली की प्रत्येकाला आंबे खाण्याचे वेध लागतात. असे हे चवदार, रसाळ, पिवळेधम्मक हापूस आंबे खाण्याची स्पर्धा झाली तर? काय मजा येईल ना… मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांनाही आंब्यावर ताव मारण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी पुण्यातील एका संस्थेने आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा आयोजित […]

पुणे तिथे काय उणे... पुण्यात आंबे खाण्याची स्पर्धा
हापूस आंब्याच्या पेटीला इतकी किंमत गेल्या शंभर वर्षात मिळाली नव्हती. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

पुणे : आंबा हा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाचं आवडत फळ. उन्हाळ्याची सुरुवात झाली की प्रत्येकाला आंबे खाण्याचे वेध लागतात. असे हे चवदार, रसाळ, पिवळेधम्मक हापूस आंबे खाण्याची स्पर्धा झाली तर? काय मजा येईल ना… मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांनाही आंब्यावर ताव मारण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी पुण्यातील एका संस्थेने आंबे खाण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे.

पुणे तिथे काय उणे अशी उपमा पुणे शहराला दिली जाते. याच शहरातील महाराष्ट्र माझा या संस्थेच्यावतीने अनोख्या आंबे खाण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या जनजागृतीच्या निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. अवघ्या दोन मिनिटात तीन आंबे खाण्याची ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत पाच ते दहा वयोगटातील लहान मुलांना सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने थेट शेतकरी ते ग्राहक आंबा विक्री केली जाते.

फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची चव लहान मुलांना चाखता यावी, यासाठी दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने रसाळ, चवदार, पिवळेधम्मक हापूस आंबे इवल्याशा हातांमध्ये पकडण्याची कसरत लहान मुलांमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने तल्लीन होऊन आंबे खाणारे चिमुकले आणि स्पर्धा जिंकण्यासाठी आंबा खाण्यासाठी मारलेला ताव असे चित्र लवकरच पुणेकरांना पाहायला मिळणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.