पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच, भवानी पेठेत 39 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?

पुण्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Pune ward wise covid19 patients). पुणे शहरात 3 मेपर्यंत 1828 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे.

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच, भवानी पेठेत 39 नवे रुग्ण, कोणत्या प्रभागात किती?
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 7:42 PM

पुणे : पुण्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Pune ward wise covid19 patients). पुणे शहरात 3 मेपर्यंत 1828 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. भवानी पेठेत 3 मे रोजी दिवसभरात तब्बल 39 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1787 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे (Pune ward wise covid19 patients).

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 106 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. भवानी पेठेत 39 नवे कोरोनाग्रस्त आढळल्याने आकडा 391 वर गेला आहे. याशिवाय, दोन वॉर्डमध्ये प्रत्येकी 200 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत, तर दोन वॉर्डमध्ये रुग्णसंख्येने प्रत्येकी दीडशेचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे येरवडा धानोरी येथील रुग्णसंख्या आता 194 वर पोहोचली आहे.

भवानी पेठेत तब्बल 391 रुग्ण आहेत. ढोले पाटील रोडला 290, तर शिवाजीनगर घोले रोडला एकूण 240 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर सर्वात कमी म्हणजे तीन रुग्ण औंध बाणेर आणि कोथरुड बावधनमध्ये आहेत.

भवानी पेठ (39 नवे रुग्ण), ढोले पाटील रोड (23), येरवडा- धानोरी (12) या भागात कालच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले. दरम्यान, 2 मे रोजी शिवाजीनगर- घोलेरोड येथे तब्बल 10 नवे रुग्ण आढळले होते. काल या भागात 3 नवे रुग्ण आढळले आहेत.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध बाणेर 4 (0) कोथरुड बावधन 4 (+ 1) भवानी पेठ 391 (+39) बिबवेवाडी 68 (+4) धनकवडी सहकारनगर 121 (0) ढोले पाटील रोड 290 (+23) हडपसर मुंढवा 55 (0) कसबा विश्रामबाग वाडा 158 (+2) कोंढवा येवलेवाडी 29 (+1) नगर रोड वडगाव शेरी 49 (+1) शिवाजीनगर घोले रोड 240 (+3) सिंहगड रोड 12 (0) वानवडी रामटेकडी 95 (+5) वारजे कर्वेनगर 10 (+1) येरवडा धानोरी 194 (+12) पुण्याबाहेर 67 (+3)

संबंधित बातम्या :

रखडलेल्या मेगाभरतीला पुन्हा स्थगिती, कोरोनामुळे 70 हजार जागांची भरती पुन्हा रखडली

पुण्यात पोलिसाचा पहिला कोरोनाबळी, 50 वर्षीय पोलिसाचा मृत्यू

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.