रणथंबोरच्या अभायारण्यात दोन वाघांमध्ये झाली जीवघेणी लढाई; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
वाघांची ही लढाई बघून अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. | tigers fight
नवी दिल्ली: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर वाघांच्या लढाईचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वाघांची ही लढाई बघून अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत. (Tiger fight in Ranthambore)
भारताच्या रणथंबोर अभयारण्यातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सुरुवातीला दोन वाघ एकमेकांवर गुरगुरताना आणि एकमेकांचा अंदाज घेताना दिसत आहेत. 12 सेकंदांच्या या व्हिडीओत दोन्ही वाघ एकमेकांवर त्वेषाने हल्ला करत आहेत. त्यांच्या डरकाळ्यांनी जंगलाचा परिसर अक्षरश: दणाणून गेला आहे.
Some fights are lethal, one of the reason for Tiger death is Territorial fights. Today #Ranthambhore Use @ParveenKaswan@Saket_Badola @GauravSharmaIFS @susantananda3 @rameshpandeyifs @RandeepHooda via WA forward by team member. pic.twitter.com/QUDD3QLHOy
— WildLense® (@WildLense_India) December 5, 2020
@WildLense_India या ट्विटर अकाऊंवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, काही लढाया या धोकादायक असतात. रणथंबोर अभयारण्यात वाघांचा मृत्यू होण्यामागे त्यांच्यातील लढाया हे प्रमुख कारण आहे.
‘ऊसाच्या शेतात शिरलं हत्तीचं पिल्लू; कोणीतरी आल्याचे कळताच खांबाआड लपलं’
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हत्तीच्या एका पिल्लाचा फोटो व्हायरल झाला होता. थायलंडच्या चेंग माई या डोंगररांगातील हा व्हिडीओ होता. याठिकाणी ऊसाची शेतं आहेत. या शेतांमध्ये एक हत्तीचे पिल्लू शिरले होते. मात्र, कोणीतरी त्या दिशेने बॅटरी फिरवल्यानंतर हे पिल्लू विजेच्या खांबामागे उभं राहून लपण्याचा प्रयत्न करत होते. हा गोंडस फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही या छोट्याश्या हत्तीच्या प्रेमात पडले होते.
इतर बातम्या:
‘हत्ती’योग महागात पडला, रामदेव बाबा कोसळले, व्हिडीओ व्हायरल
PHOTO 16 तास विहिरीत तगमग, हत्ती अखेर बाहेर
गडचिरोलीत हत्ती गाळात रुतला, तडफडून थकला, 20 दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू
(Tiger fight in Ranthambore)