2024 ला नरेंद्र मोदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

Cm Ekanath Shinde on Loksabha Election 2024 : रोजगार, रस्ते अन् स्थानिक प्रश्न; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा, काय बोलले पाहा सविस्तर...

2024 ला नरेंद्र मोदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 3:00 PM

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे रत्नागिरीत आहेत. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर बोलताना पुन्हा युतीचं सरकार येईल, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. यासोबतच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमावरही त्यांनी भाष्य केलंय.

2019 ला मोदींच्या लाटेत विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून गेले. आता पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडणून येणार आणि पुन्हा युतीचं सरकार सत्तेत येणार, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

75 हजार नागिराकंना आम्ही रोजगार देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की मल्टीनॅशनल कंपनीत लोकांना रोजगार देता येईल. केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. फंड देत आहे. मुंबई गोवा महामार्ग यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातलं. मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता लवकरच बनवणार आहोत, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

शासन आपल्या दारी या अभियानातून सगळ्यांना लाभ होणार आहे. याठिकाणी आलेले सगळे लाभार्थी आहेत. शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. चांगलं शासन असं त्यांच ध्येय होतं. तोच आदर्श समोर ठेवून राज्य सरकार काम करत आहे. आधीची अडीच वर्ष सोडली तर आता आम्ही कॅबिनेटमध्ये सर्वसामान्य नागिकांसाठी निर्णय घेतले आहेत. सर्वमान्य लोकांच्याआयुष्यात बदल झाला पाहिजे, हाच अजेंडा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

अडीच वर्षात आपण कारभार पाहिला आहे. सरकार कुठे होतं, हे आपण पाहिलं आम्ही लोकांच्या दारात जातोय.सरकारी काम आणि 6 महिने थांब हे चित्र आम्हाला बदलायचं आहे, असा मानस शिंदेंनी बोलून दाखवलाय.

अनेक लोक माझ्याकडे येतात. जी काम जिल्हा पातळींवर होऊ शकता. आता ती कामं स्थानिक पातळीलाच होतील. लोकांच्या मनात शासनाबद्दलचं मत बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून असे कार्यक्रम घेत आहेत. पूर्वीचं अडीच वर्ष सरकार सोडलं तर 35 कॅबिनेट बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले. आमचा अजेंडा सर्वसामान्यच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजेत, हाच आहे. गेल्या अडीच वर्षाचा कारभार आपण पाहिला. आता मात्र या सगळ्यात बदल होतोय, असंही ते म्हणालेत.

शासन आणि प्रशासन रथाची दोन चाक आहेत. ती समान वेगाने धावली पाहिजेत. सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले आहेत. आता स्पीड पकडायला हरकत नाही. ऑनलाईन नाही, फेसबुक नाही तर डायरेक्ट फिल्डवर जाऊन आम्ही लोकांची कामं करतोय, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.