VIDEO | रत्नागिरीत मिऱ्या समुद्रावर भरकटलेले जहाज संरक्षक भिंतीवर धडकले

समुद्राच्या अजस्त्र लाटांशी जहाजाची झुंज सुरु आहे. जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Ratnagiri Ship Stuck in Mirya Sea)

VIDEO | रत्नागिरीत मिऱ्या समुद्रावर भरकटलेले जहाज संरक्षक भिंतीवर धडकले
Follow us
| Updated on: Jun 03, 2020 | 11:22 AM

रत्नागिरी : ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोंगावत असतानाच रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रावर अजस्त्र लाटांमध्ये जहाज भरकटले होते. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने समुद्राच्या अजस्त्र लाटांशी जहाजाची झुंज सुरु होती. अखेर काही वेळाने हे जहाज पंधरा माड परिसरात संरक्षक भिंतीवर येऊन थडकले. (Ratnagiri Ship Stuck in Mirya Sea)

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासूनच कोणालाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. रत्नागिरीत सध्या एनडीआरएफच्या दोन टीम दाखल आहेत. मात्र मिऱ्या समुद्रावर अजस्त्र लाटा उसळलेल्या असताना जहाज भरकटल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र प्रशासनाला त्यात यश आले नव्हते. जहाजावर अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

(Ratnagiri Ship Stuck in Mirya Sea)

रत्नागिरीतील देवरुखमध्ये पाऊस आणि वाऱ्याने जोर धरला आहे. देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून 50 किमी दूर असलेल्या देवरुखलाही जाणवला.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचे ताजे अपडेट इथे वाचा : CYCLONE NISARGA LIVE UPDATE

परिसरात काल मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु होता. सकाळी 6 वाजल्यापासून पावसाने जोर धरला. पावसासोबत वाराही वेगाने वाहत होता. शहरातील भंडारवाडी येथे वाऱ्याने एक वृक्ष मूळासकट उन्मळून पडला. यामुळे घरांचे नुकसान झाले.

कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आज (बुधवार 3 जून) आणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. (Ratnagiri Ship Stuck in Mirya Sea)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.