AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई-वडील मुंबईत, अभ्यासासाठी एकटाच गावी, MPSC परीक्षा पुढे गेल्याने तरुणाची आत्महत्या

MPSC परीक्षा वारंवार पुढे गेल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात युवकाने आत्महत्या केली.

आई-वडील मुंबईत, अभ्यासासाठी एकटाच गावी, MPSC परीक्षा पुढे गेल्याने तरुणाची आत्महत्या
| Updated on: Nov 28, 2020 | 4:00 PM
Share

रत्नागिरीMPSC परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात युवकाने आत्महत्या केली. महेश झोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणांचं नाव आहे. वाढतं वय आणि MPSC परीक्षा वारंवार पुढे जात असल्याचं कारण देत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Ratnagiri youth Mahesh Zore Suicide over MPSC Exam postpone)

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाला MPSC परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागत आहे. याच गोष्टीचं नैराश्य महेशच्या मनात होतं. अखेर राहत्या घरातच त्याने गळफास घेऊन आपली जीवननात्रा संपवली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोर्ले गावातली ही घटना आहे.

आत्महत्या करण्याअगोदर महेशने एक सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये परीक्षा पुढे जात आहे म्हणून मी आत्महत्या करतो आहे, असं त्याने नमूद केलं. स्थानिक पोलीस स्टेशन लांजा येथे त्याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महेशच्या मृत्यूबद्दल पोलिस प्रशासनाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. रत्नागिरी पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती विचारली असता त्यांनी स्थानिक पोलिसांकडून याबद्दलची माहिती घ्या, असं सांगितलं. तर दुसरीकडे स्थानिक पोलिस पोलिस अधिक्षकांचं नाव सांगून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. एकूणच या प्रकरणात उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहे.

महेशच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असून त्याचे आई आणि वडील कामासाठी मुंबईला असतात. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून महेश गेले अनेक दिवस अभ्यास करत होता. मात्र नैराश्याने मनात इतकं घर केलं की महेशने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

(Ratnagiri youth Mahesh Zore Suicide over MPSC Exam postpone)

संबंधित बातम्या

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.