Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिसेंबरमध्ये किफायतशीर कार खरेदी करण्याची संधी, रेनॉ KWID वर 20,000 रुपयांचा डिस्काऊंट

डिसेंबर महिन्यात अनेक वाहन कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर विविध ऑफर्स सादर केल्या आहेत. Renault कंपनीदेखील ग्राहकांना स्वस्तात खार खरेदी करण्याची संधी दिली आहे.

डिसेंबरमध्ये किफायतशीर कार खरेदी करण्याची संधी, रेनॉ KWID वर 20,000 रुपयांचा डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 11:53 PM

मुंबई : डिसेंबर महिन्यात अनेक वाहन कंपन्यांनी त्यांच्या कार्सवर विविध ऑफर्स सादर केल्या आहेत. Renault कंपनीदेखील ग्राहकांना स्वस्तात खार खरेदी करण्याची संधी दिली आहे. Renault कंपनीने स्वस्त आणि लोकप्रिय रेनॉ क्विड (Kwid) कारवर जबरदस्त डिस्काऊंट दिला आहे. कंपनी Renault RXL AMT वेरिएंट्सवर 20 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे. तसेच या कारच्या खरेदीवर 45 हजार रुपयांपर्यंतच्या बेनेफिट ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. या बेनेफिट्समध्ये कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बेनेफिट्सचा समावेश आहे. (Renault December special offer cash discount of rs 20000 on Kwid)

रेनॉ क्विड (Renault Kwid) या कारची एक्स शोरुम किंमत 3 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारवर 45 हजार रुपयांपर्यंतच्या बेनेफिट्स ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये निवडक व्हेरिएंट्सवर 20 हजार रुपयांपर्यंतचा रोख डिस्काऊंट, 15 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर, 10 हजार रुपयांपर्यंतच्या लॉयल्टी बेनेफिट्सचा समावेश आहे. इतर व्हेरियंट्सवर 15 हजार रुपयांपर्यंतचा रोख डिस्काऊंट दिला जात आहे.

‘या’ लोकांना 9 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळणार

रेनॉकडून अप्रूव्ह कॉर्पोरेट्स आणि पीएसयूसाठी 9 हजार रुपयांपर्यंतचा कॉर्पोरेट बोनस लागू आहे. ग्रामीण ग्राहक जसे की, सरपंच, शेतकरी, ग्रामपंचायतीचे सदस्य यांना 5 हजार रुपयांची स्पेशल ऑफर देण्यात आली आहे. कोर्पोरेट बोनस अथवा रुरल ऑफरपैकी कशाचाही लाभ घेता येईल.

10 हजार रुपयांची लॉयल्टी बेनेफिट ऑफर लागू

लॉयल्टी बेनेफिट्समध्ये जुन्या रेनॉ मॉडेलच्या बदल्यात रेनॉ क्विड घेतल्यास एक्सचेंज बेनेफिट्स मिळतील. तसेच ज्या ग्राहकाकडे आत्ता एखादी रेनॉ कार आहे, त्याच ग्राहकाने रेनॉची अजून एक कार खरेदी केली तर त्याला कॅश डिस्काऊंटही मिळेल. क्विडच्या STD आणि RXE 0.8L व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची लॉयल्टी बेनेफिट ऑफर लागू आहे.

Renault KWID मधील फिचर्स

रेनॉच्या क्विड RXL ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये फुल व्हील कवर, इन्टर्नली अॅडजस्टेबल ORVM, एसी, इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग आणि फ्रंट पॉवर विंडो मिळणार आहे. तसेच यात 12V फ्रंट पॉवर सॉकेट, रेडियो आणि एमपी3 सोबत सिंगल डिन स्टीरियो, हँड्स-फ्री टेलिफोन आणि ऑडियो स्ट्रीमिंग साठी ब्लूटूथ, थिएटर डिमिंगसोबत केबिन लाइट, ट्रॅफिक असिस्टन्स मोड आणि फ्रंट स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

जबरदस्त इंजिन

क्विडच्या सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये 1.० लीटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. जे 68 पीएसचे पॉवर आणि 91 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. इंजिन 5 स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) गियरबॉक्ससह देण्यात आले आहे.

Renault KWID मधील सेफ्टी फिचर्स

सेफ्टीसाठी क्विड RXL AMT व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर्स, एबीएस, ईबीडी, सीट बेल्ट रिमाइंडर, ओवरस्पीड अलर्ट, रियर डोर चाइल्ड लॉक, हाई माउंटेड स्टॉप लॅम्प आणि सेंट्रल लॉकिंग सोबत रिमोट कीलेस एंट्री यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

Renault ची नवी ऑफर, केवळ 1403 रुपयांच्या हप्त्यांवर रेनॉ क्विड घरी घेऊन जा

Renault Kwid : भारतीयांच्या मनात भरलेली ‘ही’ कार क्रॅश टेस्टमध्ये फेल

(Renault December special offer cash discount of rs 20000 on Kwid and benefit offers worth 45000)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.