AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचा एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार – यशोमती ठाकूर

या योजने अंतर्गत सन 2020-21 या वर्षांत 900 प्रकरणे आली होती यापैकी 875 प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे.

सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचा एकरकमी लाभ दिवाळीच्या आत मिळणार - यशोमती ठाकूर
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 10:28 PM

मुंबई : राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचान्यांना एल. आय.सी. योजनतंर्गत निवृत्तीनंतर देण्यात येणारे एक रक्कमी लाभ दिवाळीच्या आत देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. (Retired Anganwadi workers will get a lump sum benefit within Diwali said by Yashomati Thakur)

मंत्रालयात अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, एल आय सी चे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका, पर्यवेक्षिका या पदावर निवड होईपर्यंत एल.आय.सी. योजनेतंर्गत एक रक्कमी लाभ देण्याबाबतची योजना राज्यात सुरू आहे.

या योजने अंतर्गत सन 2020-21 या वर्षांत 900 प्रकरणे आली होती यापैकी 875 प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे तृटी असणारे आणि मागील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून या सेविकांची दिवाळी गोड करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

एल.आय.सी मार्फत अंगणवाडी सेविकांना वयाची 65 वर्ष पूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर एक लाख रुपये एकरकमी लाभ देण्यात येणार आहे. तसेच राजीनामा, सेवेतून काढून टाकण्यात आलेले व सेवेत कार्यरत असतांना मृत्यू पावल्यालेल्या सेविकांच्या वारसदारांस ही एव्हढीच रक्कम देण्यात येणार आहे. मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 75 हजार रक्कम देण्यात येणार असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या – 

कल्याण-डोंबिवलीकरांचा पॅटर्न यशस्वी झाला, असा रोखला कोरोनाचा धोका

ICICI-Axis बँकांचा ग्राहकांना मोठा झटका, आता खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी लागणार फी

(Retired Anganwadi workers will get a lump sum benefit within Diwali said by Yashomati Thakur)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.