अजूनही रियाचं सुशांतवर प्रेम, Love is Power म्हणत टीकाकारांना खास उत्तर

रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) आज बांद्रामध्ये नवीन घर शोधताना दिसला. रियासोबत तिचा भाऊ शाैविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) देखील तिच्यासोबत होती.

अजूनही रियाचं सुशांतवर प्रेम, Love is Power म्हणत टीकाकारांना खास उत्तर
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 7:18 PM

मुंबई : रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) आज बांद्रामध्ये नवीन घर शोधताना दिसली. रियासोबत तिचा भाऊ शाैविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) देखील होता. मात्र, यावेळी रिया चक्रवर्तीने घातलेल्या टी-शर्टवरून आता चर्चा रंगताना दिसत आहे. रियाच्या टी-शर्टवर लिहिले होते की, प्रेम म्हणजे पावर यावरून रियाने तिच्यावर टिका करणाऱ्यांना एक प्रकारचे जणू प्रतिउत्तरच दिले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर रियाने स्वत: सोशल मीडियावर सांगितले की होते की, ती सुशांतची गर्लफ्रेंड आहे. (Riya Chakraborty responds to critics)

त्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर बरेच आरोप केले आणि त्यानंतर रियाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. सुशांत प्रकरणात ड्रग्सचा अँगल आल्यानंतर रियाला एनसीबीने अटकही केली होती. काही दिवस रियाला तुरुंगात राहवे लागले होते त्यानंतर आता ती जामीनावर बाहेर आली आहे.

रिया जवळपास एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती  पण, नव्या वर्षात रिया देखील नवी सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. रिया 2021 मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे.“रियाचा कमबॅक तिला या शॉकमधून बाहेर येण्यास मदत करेल. रिया 2021 मध्ये कामावर वापसी करणार आहे”, अशी माहिती रियाचा मित्र रुमी जाफरीने दिली.

रुमी जाफरीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली होती. “हे वर्ष रियासाठी अत्यंत धक्कादायक ठरलं. हे वर्ष तर सर्वांसाठीच वाईट होतं. मात्र, तिच्यासाठी हा धक्का खूप मोठा होता. एक मिडल क्लास कुटुंबाची मुलगी एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यामुळे ती खूप खचली आहे.”

रुमी जाफरीने रियाला आश्वासन दिलंय की संपूर्ण इंडस्ट्री मोठ्या मनाने तिचं स्वागत करेल. त्यांनी सांगितलं की, “ते नुकतेच रियाला भेटले होते. ती यावेळी अत्यंत शांत होती. ती काहीही बोलली नाही. ज्या दुखातून ती गेली आहे, त्यानंतर तिच्यावर कुठलाही आरोप करणे चुकीचं आहे. आता सर्व सांत होऊ द्या. मला माहिती आहे की तिच्याजवळ आता बोलायला काहीही नाही”, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसांसाठी सेगवेचे अक्षय कुमारच्या उपस्थिती लॉन्चिंग, मात्र चर्चा अक्षयच्या खास ट्राऊझरची!

Shocking : ड्रग्ज केसमध्ये सारा अली खानचं नाव, हातातून गेला दूसरा मोठा चित्रपट!

(Riya Chakraborty responds to critics)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.