‘केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास’, गणेश देवींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांवर आणि ते मंजूर करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर सडकून टीका केली आहे (RSD president Dr Ganesh Devy criticize Modi Government over New Farm Bill).

'केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही, लोकांच्या विचारशक्तीवर माझा विश्वास', गणेश देवींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Sep 24, 2020 | 7:54 PM

कोल्हापूर : राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी विधेयकांवर आणि ते मंजूर करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर सडकून टीका केली आहे (RSD president Dr Ganesh Devy criticize Modi Government over New Farm Bill). शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी 150 वर्ष जे झटले त्या सर्वांच्या परिश्रमाचं आता मातीमोल झालं आहे, असं मत गणेश देवी यांनी व्यक्त केलं. गणेश देवी यांनी आजपासून (24 सप्टेंबर) केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात राज्यव्यापी यात्रा सुरु केली आहे. या यात्रेची सुरुवात आज कोल्हापुरातून राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळापासून केली. त्यावेळी ते बोलत होते. या यात्रेत महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकाचं जाहीर वाचनही केलं जाणार आहे.

गणेश देवी म्हणाले, “समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तीचा विचार न करता कायदे केले जातं आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती बद्दलण्यासाठी 150 वर्षे झटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे परिश्रम आता मातीमोल होत आहेत. कोव्हिडसारखा आजार, अर्थव्यवस्था खड्यात गेलीय, अशा स्थितीत जमिनीचे, शेतीचे कायदे बदलले तर काय होईल? हमाल, शेतकरी, शेतकऱ्यांची मुलं बाजारात समित्यांवर होणार परिणाम जाणून घेतील.”

“सरकार त्यांचे संशयास्पद गडबड असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घाई करत आहे. ज्यांनी भारत बनवला त्यांचं स्वप्न आणि या सरकारचे उद्दिष्ट यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. सरकार त्यांच्या उद्देशासाठी घोडदौड करत आहे. समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तीचा विचार न करता कायदे केले जात आहेत. सध्या अँटी पीपल लॉज म्हणजे जनविरोधी कायदे करण्याचा काळ सुरु आहे. जर्मनीतही हिटलरच्या काळात असेच फटाफट कायदे झाले होते. त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहिती आहे,” असं गणेश देवी म्हणाले.

“शेतकरी संघटनांच्या बंदला माझा पाठिंबा आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. शिक्षण धोरण, चीन, नोटबंदी या काळातही त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. ही त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे. मात्र, केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही. लोकांच्या विचार करण्याच्या शक्तीवर माझा विश्वास आहे. विचारांना दडपवून टाकण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. त्याची पाळेमूळे एका संस्थेकडे जात आहेत. हे समोर असतानाही त्या संस्थेचं संरक्षण करण्याचं काम होतंय,” असंही गणेश देवींनी नमूद केलं.

कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉ. देवी यांनी शेतकरी आणि नागरीक यांच्याशी आज संवाद साधला. शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशीही शेती कायद्यांविरोधी देशव्यापी शेतकरी कामगारांची एकजूट उभारण्याविषयी डॉ. देवी यांनी बातचीत केली.

आज राज्यभर राष्ट्र सेवा दल, छात्रभारती आणि समविचारी संस्था आणि संघटना यांनी एकजुटीने 250 हुन अधिक ठिकाणी निषेध आंदोलनं केली. आज महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकातील शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणं स्पस्ट करणाऱ्या उताऱ्यांचे जाहीर वाचन या निषेध आंदोलनात करण्यात आले. साने गुरुजी स्मारक, पुणे येथे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांच्या उपस्थितीत “आम्ही शेतकऱ्यांसोबत” अभियानाची सुरवात ‘शेतकऱ्यांचे असुड’ या पुस्तकातील प्रकरण वाचून करण्यात आली. यावेळी शिवराज सूर्यवंशी, राकेश नेवासकर, कबीर पळशीकर, ममता गायकवाड, प्रियांका सोनवणे, पांडूरंग चौरे, निलेश वर्णे हे उपस्थित होते.

आमदार कपिल पाटील यांचे मुंबईत निषेध आंदोलन

लोकभारतीचे अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी आज मुंबईत मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शेती आणि कामगार कायद्याचा निषेध करत आंदोलन करून आम्ही शेतकऱ्यासोबत आहोत असा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या सोबत लोकभारतीचे मुंबईचे नेते अरविंद सावला या आंदोलनात होते. परळ येथे लोकभारतीचे अरुण लावंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निषेध आंदोलन केलं. उदगीर येथे लोकभारतीचे नेते अजित शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं.

कृषी कायदा विरोधी यात्रेचं वेळापत्रक

24 सप्टेंबरला : कागल – शाहू महाराजांचे जन्मस्थान येथे शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाचे जाहीर वाचन करुन निषेध अभियानाची सुरुवात.

24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर : कागल ते मुंबई असा क्रमाक्रमाने प्रवास. मार्गावरच्या खेड्यात, शहरात शेतकऱ्यांच्या-नागरिकांच्या सभा आणि कायदेभंग (कोव्हिडशी संबंधित नियम पाळून). त्यात शेतकऱ्यांचा आसूडचे जाहीर वाचन आणि त्याच्या प्रतीचे वितरण.

2 ऑक्टोबरला : शेतकरी-नागरिक-समग्र जनतेच्यावतीने महाराष्ट्र सरकारला हा कायदा महाराष्ट्रापुरता धुडकारुन लावून तो राज्यात लागू करू नये, असे निवेदन देणार.

अशाचप्रकारे कागल ते कर्नाटकची राजधानी बंगळुर निषेध अभियान पथकं निघणार आहेत.

संबंधित बातम्या :

स्त्रियांना बंधनात ठेवण्याच्या विचारांचा कॅन्सर झालेल्या सरकारशी लढावं लागेल : डॉ. गणेश देवी

विद्यार्थ्यांना 50 गुणांचा संविधान अभ्यासक्रम अनिवार्य करा, महाराष्ट्रातील विचारवंतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लग्न करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही, हजारो तरुणांचा निर्धार

संबंधित व्हिडीओ :

RSD president Dr Ganesh Devy criticize Modi Government over New Farm Bill

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.