एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली.

एपीएमसी भाजीपला बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Follow us
| Updated on: Mar 27, 2020 | 12:36 PM

नवी मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा (APMC market rush navi mumbai) केली. लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक मोठ्या बाजारपेठाही बंद करण्यात आल्या होत्या. पण नागरिकांची गरज पाहता कोकण आयुक्त शिबाजीराव दौड यांच्या मध्यस्थीत नवी मुंबईतील एपीएमसी बाजार सुरू करण्यात आला. परंतु बाजार आवारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही गर्दी रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाला अपयश आले असल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांच्या बंदनंतर बाजार आवारात आज 450 भाजीपाला गाड्याची आवक झाली. काल रात्री 12 वाजल्यापासून बाजारात व्यापारी, किरकोळ खरेदीदार यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केटच्या गेटवर जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला आहे. या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझर लाऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा. सदर सुचनेचे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीबतवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं ठळकपणे सूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

मार्केटच्या आत येणाऱ्या गाड्यांवर सोडियम हायड्रोक्लोर्यीडची फवारणी केली जात होती. मात्र रात्री 2 मध्ये सुरू होणाऱ्या या भाजीपला मार्केटच्या गेट बाहेर होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. या गर्दीवर नियंत्रण करण्याची गरज आहे नाहीतर बाजार आवारात एकाला कोरोना लागण झाली तर मोठ्या प्रमाणात पसरू शकते असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांना भाजीपाला आणि अन्न धान्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी  बाजार समितीमधील बाजार सुरु करणे गरजेचे होते. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाकडून गेली कित्येक दिवस व्यापारी, बाजार समिती घटक, कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि रेशनींग अधिकारी यांची बैठक घेण्याचे काम सुरु होते. या दरम्यान कोकण आयुक्त शिवाजीराव दौड यांच्या अध्यक्षेतेखाली एक महत्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व घटकांच्या उपस्थितीनंतर मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, नवी मुंबईत कोरोनाचे 7 रुग्ण आढळून आले आहेत त्यासाठी महानगरपालिका आणि इतर प्रशासन जोरात कामाला लागले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.