AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिरात तोकडे कपडे नको, भारतीय पेहरावात दर्शनासाठी या, साईबाबा संस्थानचे आवाहन

साईमंदिरात 'तोकडे कपडे घालून येऊ नका. भारतीय पेहरावात यावं,' असं आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे. (Saibaba Sansthan indian devotees)

मंदिरात तोकडे कपडे नको, भारतीय पेहरावात दर्शनासाठी या, साईबाबा संस्थानचे आवाहन
| Updated on: Nov 30, 2020 | 9:26 PM
Share

अहमदनगर : फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून  (Saibaba Sansthan) करण्यात आलं आहे. (Saibaba Sansthan appeal devotees to come with indian costume not in short dress)

अनलॉक अंतर्गत राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. यामध्ये शिर्डीतील साईबाबांचे मंदिरदेखील दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे हे मंदिर खुले झाल्यापासून साईभक्तांची येथे मोठी गर्दी होत आहे. मंदिर प्रशासनाने सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पाळून दर्शनाची व्यवस्था केलेली आहे.

तोकडे कपडे नको, संस्थानचे आवाहन

मात्र, तोकडे कपडे खालून साईमंदिरात येऊ नका. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी भारतीय पेहरावात यावं, असं आवाहन साईबाबा संस्थानने केले आहे. भक्तगण दर्शनासाठी तोकडे कपडे घालून येत आहेत, अशी तक्रार यापूर्वी काही भक्तांनी साईबाबा संस्थानकडे केली होती. याच तक्रारीची दखल घेत, साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकारने मंदिरं खुली करताना कोव्हिडचा संस‌र्ग होऊ नये यासाठी नियमावली आखून दिलेली आहे. परंतु, साईबाबा संस्थानने केलेल्या‌ सगळ्या उपाययोजना फोल ठरल्याचे समोर आले होते. ऑनलाईन दर्शनात वेळोवेळी तांत्रिक बिघाड येत असल्याने प्रत्यक्ष पद्धतीने दर्शन घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे 17 नोव्हेंबर रोजी समोर आले होते.

संबंधित बातम्या :

अबब! अवघ्या 9 दिवसांत साईचरणी कोट्यवधींचं दान

तुळजाभवानी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा!, भाविक, पुजारी, व्यापारीही मास्कविना, ज्येष्ठांनाही मंदिरात प्रवेश

शिर्डीमध्ये मंदिर सुरू झालं पण भाविक आणि प्रशासन नियम पाळतंय का? वाचा रिअ‍ॅलिटी चेक

(Saibaba Sansthan appeal devotees to come with indian costume not in short dress)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.