AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सीताहरणवर’ रावण vs भाजपा! सैफवर का भडका?

'आदिपुरुष' चित्रपटात हिंदूंच्या भावनांना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला तर ते भाजप सहन करणार नाही, असा इशारा भाजप नेते राम शिंदे यांनी दिला आहे (Saif Ali Khan statement on Sitaharan).

'सीताहरणवर' रावण vs भाजपा! सैफवर का भडका?
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 5:16 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. सैफ अली खान 2022 साली प्रदर्शित होणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट रामायणावर आधारीत आहे. दरम्यान, ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सीताहरण संबंधित केलेल्या टिप्पणीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात हिंदूंच्या भावनांना दुखवण्याचा प्रयत्न केला गेला तर ते भाजप सहन करणार नाही, असा इशारा भाजप नेते राम कदम यांनी दिला आहे (Saif Ali Khan statement on Sitaharan).

सैफ नेमकं काय म्हणाला?

“एका राक्षस राजाची भूमिका साकारणं हे खूप उत्साहिक आहे. मात्र ही भूमिका तितकी क्रूर नाही. आम्ही या भूमिकेला भरपूर मनोरंजनात्मक पद्धतीने बनवणार आहोत. सीतेचं अपहरण आणि रामासोबत झालेलं युद्ध हे सूड घेण्याच्या ईष्येने झालं असल्याचं आम्ही दाखवणार आहोत. लक्ष्मनने रावणाची बहिण सुपर्नकाचं नाक कापलं होतं. त्याचाच सूड उगवण्यासाठी सीतेचं अपहरण करण्यात आलं आणि रामासोबत युद्ध झालं, असं आम्ही दाखवणार आहोत”, असं वक्तव्य सैफ अली खानने केलं आहे (Saif Ali Khan statement on Sitaharan).

राम कदम काय म्हणाले?

“प्रभू श्रीरामांनी धर्माची स्थापना केली. श्रीराम आणि रावण यांच्या धर्म आणि अधर्माची लढाई होती. चित्रपट दिग्दर्शकाने हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन चित्रपट तयार करावा. ओम राऊतने ज्या प्रकारे याआधी तानाजी चित्रपट बनवून हिंदू धर्म आणि मराठी अस्मितेचा उजागर केला होता, त्याचप्रकारे या सिनेमातही हिंदूंची आस्था आणि श्रद्धेचा सन्मान व्हावा. आमच्या आस्थेला जराही ठेच लागली तर हिंदू समाज सहन करणार नाही”, असा इशारा राम कदम यांनी दिला आहे.

सैफची माफी

सैफने सीताहरणबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर प्रचंड भडका उडाला. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली. त्यानंतर भाजप नेते राम कदम यांनी देखील इशारा दिला. या सर्व घडामोडीनंतर सैफने आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. ‘व्हायरल भयानी’ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सैफची भूमिका शेअर केली आहे. मला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असं सैफ म्हणाला आहे.

‘आदिपुरुष’ सिनेमात रामाची भूमिका प्रभास साकारणार

‘आदिपुरुष’ हा चित्रपट 2022 साली 15 ऑगस्टला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत करत आहे. ओम राऊतने याआधी ‘तानाजी- द अनसंग वॉरीअर’ नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात सैफ अली खानने खलनायकची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘आदिपुरुष’ या चित्रपटातही सैफ खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आदिपुरुष चित्रपटात बाहुबली फेम अभिनेता प्रभास श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. तर कृती सेनन सीता देवीची भूमिका निभावणार आहे. या चित्रपटाचा बजेट 400 कोटींपेक्षा जास्त आहे. 2021 च्या जानेवारी महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल.

मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.