गंभीर आजाराने ग्रासलेल्या Samantha Ruth Prabhu चा ‘तो’ फोटो अखेर समोर
गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या समंथाच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट; खुद्द अभिनेत्री फोटो पोस्ट करत म्हणाली...
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता नागा चैतन्यसोबत विभक्त झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दल अनेक मोठे खुलासे समोर आले. घटस्फोटानंतर चर्चा रंगली ती म्हणजे अभिनेत्रीच्या आजाराची. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या आजाराबद्दल चाहत्यांना सांगितलं. त्यानंतर चाहत्यांनी देखील अभिनेत्रीसाठी प्रर्थना केली. गेल्या काही दिवसांपासून समंथा मायोसिटिस (Myositis) नावाच्या आजाराचा सामना करत आहेत. अभिनेत्रीने रुग्णालयातील एक फोटो देखील पोस्ट केला होता.
आता उपचारानंतर अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. प्रकृती सुधारल्यानंतर समंथाने कामाला सुरुवात देखील केली आहे. अभिनेत्रीने आगामी ‘शकुंतलम’ सिनेमाच्या शुटिंगसाठी पुन्हा तयारी सुरु केली आहे. अभिनेत्रीचा सिनेमा १७ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. अभिनेत्रीने सिनेमातील स्वतःच्या भूमिकेची एक झलक देखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.
फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘जगातील वेडेपणा, निराशा, आपलेपणाच्या नुकसानासाठी कला हेच माझ्यासाठी उपाय आहे. याच्या मदतीने मी माझ्या घरापर्यंत चालेल…’ असं लिहिलं आहे. हे विचार निक्की रोवे यांचे आहेत. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
समंथाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर सिनेमा रोमांटिक ड्रामावर आधारलेला आहे. सिनेमाचं लेखण आणि दिग्दर्शन गुणशेखर यांचं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगत आहे. पोस्ट पाहून चाहत्यांनी अभिनेत्रीला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा तर, तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
समंथाच्या ‘शकुंतलम’ सिनेमात तिच्यासोबत देव मोहन, अदिति बालन, गौतमी आणि अनन्या नगल्ला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणून अभिनेत्रीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता फक्त साऊथच नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू प्रचंड प्रसिद्ध आहे.
‘यशोदा’ सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्या भूमिकेत दिसणाऱ्या समंथाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अभिनेत्रीला ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ अंतावा’ या गाण्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली. आता समंथा यशाच्या उच्च शिखरावर चढत आहे.