AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी डॉक्टरांचा अपमान केला नाही, कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून टोकाची भूमिका घेऊ नये : संजय राऊत

"माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती", असं शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं (Sanjay Raut explanation on doctor statement).

मी डॉक्टरांचा अपमान केला नाही, कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून टोकाची भूमिका घेऊ नये : संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 5:01 PM

मुंबई : “माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती”, असं शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनी डॉक्टरांसंबंधित केलेल्या एका वक्तव्यावरुन ‘मार्ड’ संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. मार्ड ही डॉक्टरांची संघटना आहे. या संघटनेतील डॉक्टरांकडून संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली (Sanjay Raut explanation on doctor statement).

“माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती. अपमान आणि कोटी यांच्यातील फरक जाणून घेतला पाहिजे. अशाप्रकारच्या कोट्या राजकारणात होतात, वकिलांवरही होतात. कोट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कुणावरही होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. खरंतर त्याचं कौतुक केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“भारतातील डॉक्टर एवढे अचाट आणि अफाट आहेत की त्यांनी आपला कंपाऊंडरसुद्धा तेवढा ताकदीचा निर्माण केलाय, जो डॉक्टरकीचं काम करु शकतो. खरंतर हा डॉक्टरांचा बहुमान आहे. डॉक्टरांनी आपले सहाय्यक, सहकारी यांना अत्यावश्यक समयी आपल्या बरोबरीने या कार्यासाठी उभं केलं. हे जगात कुठेच नाही, हे फक्त भारतात आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“माझ्या मनात डॉक्टरांच्या सर्व सहकाऱ्यांविषयी आदर राहिला आहे. कंपाऊडर हा प्रकार टाकाऊ नाही. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या विचाराशी संबंधित संघटनेने इतकं टोकाची भूमिका घ्यायची जरुरी नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली (Sanjay Raut explanation on doctor statement).

“डॉक्टर सध्याच्या परिस्थितीत प्रचंड मेहनत घेत आहेत. अनेकांनी आपले प्राणही गमावले. याबाबत मी ‘सामाना’मध्ये अनेकवेळा कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील केलं आहे. तरी त्यांना असं का वाटतंय की माझ्याकडून त्यांचा अपमान झाला? त्यांनी माझ्यावर उपचार केले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“ज्या मार्ड संघटनेने निषेध केला आहे, त्यांचा तसा अधिकार आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांच्या संदर्भात मी त्यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. मुळात मी काय बोललो आणि सांगितलं हे समजून न घेता एका विशिष्ट विचाराचे राजकीय लोकं ही मोहिम चालवत असतील आणि संपूर्ण डॉक्टर मंडळी आपल्यासोबत आहेत असा अभास निर्माण करत असतील तर ते बरोबर नाही”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

“जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे सगळ्यांचं म्हणणं आहे. ज्या अमेरिकेबरोबर आपली फार महान दोस्ती आहे, त्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे जागतिक आरोग्य संघटनेला फटकारले आहे. या संघटनेशी संबंधच सोडले आहेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त आहेत”, असा टीका संजय राऊत यांनी केली.

“डॉक्टर मंडळी आमचेच आहेत. जेव्हा डॉक्टरांवर काही संकट आले तेव्हा मी स्वत: व्यक्तीशा अनेकदा त्यांच्या मदतीसाठी गेलो आहे. या लॉकडाऊन आणि कोरोना काळात शिवसेनच्या अनेक लोकांनी अफाट बिलं घेतात म्हणून डॉक्टरांविरोधात आंदोलने केली आहेत. डॉक्टरांबाबत अशी भूमिका घेणं योग्य नाही, डॉक्टर हे कोरोना काळात योद्ध्याची भूमिका बजावत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“डॉक्टरांवर हल्ले करणं, तोडफोड करणं, त्यांच्याविषयी बदनामी करणं हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. हे समजावून मी अनेकदा अनेक डॉक्टरांकडे पोहोचलो आहे. अनेक रुग्णालयांमध्ये मी मध्यस्थी केली आहे. मी डॉक्टरांच्या बाजूने उभा राहिलो हे सगळ्यांना माहिती आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.