uddhav thackeray ! …तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते; मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

कोरोना रोखण्यासाठी मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (uddhav thackeray on Second wave of Covid infections)

uddhav thackeray ! ...तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते; मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 4:43 PM

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (uddhav thackeray on Second wave of Covid infections)

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या आगामी संकटाची चाहूल दिली. दिवाळीचा सण प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून हा उत्सव साधेपणाने आणि आनंदाने साजरा करा. सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आतू येऊ देऊ नका, असं आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी  फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना संकटकाळात राज्यातील सर्व धर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी धूर आणि प्रदुषणामुळे आतापर्यंत कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागल्यास वाया जाऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.

कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश नाहीत

दिवाळीनंतरचे दिवस हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँड सारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणू दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. कोरोनाशी लढतांना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत,  आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धे ही आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक् परिश्रम घेत आहेत असे सांगतानाच राज्यातील कोणतंही कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश देण्यात आले नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (uddhav thackeray on Second wave of Covid infections)

माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानात सापडले 51 हजार बाधित

कोरोना नियंत्रणात शासनासोबत राज्यातील जनतेला सहभागी करून घेण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात आले. यात ६० हजार टीम सहभागी होऊन त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली. या तपासणीमध्ये साडे तीन लाख आयएलआय व सारीचे रुग्ण आढळले. १३ लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जाणवले तर ८ लाख ६९ हजार ३७० लोकांना मधूमेह असल्याचे लक्षात आले. ७३ हजार लोकांना ह्दयरोग तर १८८४३ लोकांना कर्करोग असल्याची माहिती यातून मिळाली. १ लाख ६ हजाराहून अधिक लोकांना इतर आजार असल्याचे दिसून आले. या अभियानात ५१ हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना झाल्याचे लक्षात आले, असं ते म्हणाले. घरोघर जाऊन राज्यातील लोकांची आरोग्य तपासणी केल्यामुळे राज्याचा आरोग्य विषयक नकाशा यातून स्पष्ट झाला. वेळेत कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात सहभागी होऊन काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व महाराष्ट्र तुमचा ऋणी असल्याची भावना व्यक्त केली.

मास्क न वापरणे ही गोष्ट अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण ४०० जणांना बाधित करू शकतो. ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध  कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

CM Uddhav Thackeray | सर्वांसाठी लोकल सुरू करण्यास प्रयत्नशील, मुख्यमंत्र्यांकडून लोकल सेवा पूर्ववत करण्याचे संकेत

शहीद जवानांच्या वीरपत्नी आणि माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

(uddhav thackeray on Second wave of Covid infections)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.