श्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं ‘अजब फिल्मी कनेक्शन’

अभिनेता शक्ती कपूर, सुशांतवर बनत असलेल्या चित्रपटात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकाऱ्याच्या (Officer) भूमिकेत दिसणार आहेत.

श्रद्धा कपूरची NCB चौकशी, वडील शक्ती कपूर यांचं 'अजब फिल्मी कनेक्शन'
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 1:49 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने एनसीबीने शनिवारी (26 सप्टेंबर) अभिनेत्री श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) चौकशी केली. क्वान कंपनीची कर्मचारी जया साहाने एनसीबी चौकशी दरम्यान, मी श्रद्धा कपूरसाठी ‘सीबीडी ऑईल’ मागवायचे, अशी कबुली दिली होती. यामुळेच श्रद्धाला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. एकीकडे श्रद्धा कपूरचे नाव ड्रग्ज कनेक्शनमध्ये अडकले आहे. तर दुसरीकडे, श्रद्धाचे वडील अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor), सुशांतवर बनत असलेल्या चित्रपटात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकाऱ्याच्या (Officer) भूमिकेत दिसणार आहेत (Shakti Kapoor as a NCB officer in film Nyay the justice).

सुशांतच्या आत्महत्येवर तयार होतोय चित्रपट

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर, त्याच्या जीवन कथेवर आधारित ‘न्याय : द जस्टीस’ (Nyay the justice) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. याच चित्रपटात शक्ती कपूर (Shakti Kapoor) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अधिकाऱ्याच्या (NCB officer) भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे सुशांत प्रकरणात त्याची माजी मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक साराओगी यांची पत्नी सरला साराओगी या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटासंदर्भात बोलताना अभिनेता जुबेर खानने इतर कलाकारांविषयीदेखील माहिती दिली. या चित्रपटात अमन वर्मा ईडी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शक्ती कपूर एनसीबी अधिकारी आणि अभिनेत्री सुधा चंद्रन सीबीआय अधिकारी साकारणार आहेत. (Shakti Kapoor as a NCB officer in film Nyay the justice)

जुबेर खान या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतशी (Sushant singh Rajput) साधर्म्य असणारे, ‘महेंद्र सिंह’ मुख्य पात्र साकारत आहे. तर, अभिनेत्री श्रेया शुक्ला साकारत असलेली ‘उर्वशी’ही रिया चक्रवर्तीशी मिळतीजुळती आहे. याचबरोबर सारा अली खान, अंकिता लोखंडे, कृति सेनॉन, श्रुती मोदी आणि दिशा सालियन यांच्यावर आधारित पात्रांसाठीदेखील अभिनेत्रींची निवड करण्यात आल्याचे जुबेरने सांगितले.

‘बिग बॉस’ फेम सोमी खान दिशा सालियनचे (Disha Salian) पात्र साकारणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुरू झालेला तपास आता बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनपर्यंत आला आहे. चित्रपटातदेखील या सगळ्या गोष्टींवर भाष्य केले जाणार आहे. सुशांतच्या मृत्यूसंदर्भातील सगळे अँगल यात दाखवले जातील. यात हत्येचा संशय आणि आत्महत्येच्या अँगलचा देखील समावेश असणार आहे. चित्रपटात पाच गाण्यांचादेखील समावेश आहे. दिलीप गुलाटी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, ऑक्टोबरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. तर, डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याचे जुबेर खानने सांगितले.

(Shakti Kapoor as a NCB officer in film Nyay the justice)

संबंधित बातम्या : 

श्रद्धा कपूरकडून ड्रग्ज सेवनाचा इन्कार; ‘छिछोरे’च्या पार्टीला गेले, मात्र ड्रग्ज घेतलं नाही!

दीपिका पदुकोणची डिलीट केलेली चॅट एनसीबीकडे कशी? WhatsApp कडून खुलासा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.