Shekhar Kapur | शेखर कपूर FTIIचे नवे अध्यक्ष, गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमनपदीही विराजमान

दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर एफटीआयआय गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमन (Chairman) पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Shekhar Kapur | शेखर कपूर FTIIचे नवे अध्यक्ष, गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमनपदीही विराजमान
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 11:18 AM

मुंबई : दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर एफटीआयआय गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमन (Chairman) पदावरही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेखर कपूर हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘मासूम’, ‘बॅंडिट क्वीन’, ‘मिस्टर इंडिया’सारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे (shekhar kapur appointed as president of FTII society and chairman of the governing council).

शेखर कपूर (Shekhar Kapur) हे केवळ बॉलिवूडपुरतेच मर्यादित नसून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. त्यांच्या या नव्या नियुक्तीबद्दल केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली. शेखर कपूर 3 मार्च 2023पर्यंत हा पदभार सांभाळणार आहेत.

याआधी दिग्दर्शक-निर्माते बी.पी. सिंह हे FTIIचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडून हा कारभार शेखर कपूर यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. बी.पी. सिंह यांचा कार्यकाळ मार्च 2020 मध्येच संपुष्टात आला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे नव्या नियुक्त्या करणे शक्य नसल्याने बी.पी. सिंह यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

शेखर कपूर यांचा ‘पद्मश्री’ने सन्मान

भारतीय मनोरंजन विश्वासह आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील शेखर कपूर (Shekhar Kapur) यांच्या कामाची दखल घेतली जाते. वयाच्या 22व्या वर्षी सीए बनलेले शेखर कपूर पुढे चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. ‘मासूम’ सारख्या संवेदनशील विषयाच्या चित्रपटामधून त्यांनी 1983मध्ये दिग्दर्शनाला सुरूवात केली. या चित्रपटामध्ये नसीरूद्दीन शाह, शबाना आज़मी, उर्मिला मातोंडकर, जुगल हंसराज यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2002मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले होते. (shekhar kapur appointed as president of FTII society and chairman of the governing council)

सुशांत सिंह राजपूतचे निकटवर्तीय शेखर कपूर

शेखर कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला होता. शेखर कपूर हे सुशांतच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होते.

शेखर कपूर, सुशांत सिंह राजपूतसह ‘पानी’ या चित्रपटावर काम करत होते. पण, यशराज फिल्म्सने हा चित्रपट तयार होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले होते. या चित्रपटासाठी सुशांतने अनेक नव्या प्रोजेक्ट्सवर पाणी सोडले होते. मात्र, हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळेच सुशांत खूप खचला आणि नैराश्यात गेल्याचा खुलासा शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी केला होता. तसे, ‘पानी’ हा चित्रपट आपण पूर्ण करणार असून, तो सुशांतला समर्पित करणार असल्याचे शेखर कपूर यांनी जाहीर केले होते.

(shekhar kapur appointed as president of FTII society and chairman of the governing council)

संबंधित बातमी : 

Shekhar kapoor on Sushant Suicide | तुझ्या दु:खाची मला जाणीव होती, जबाबदार कोण याचीही मला कल्पना : शेखर कपूर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.