भ्रष्टाचार हाच भाजपाचा चेहरा आहे – संजय राऊत कडाडले
भ्रष्टाचारी हेच भाजपाचा चेहरा आहेत' अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी भाजपावर कडाडून टीका केली. भाजपासोबत जात नाहीत, त्यांच्यावर भाजप छापा टाकते. ईडीच्या धाडी त्यांच्यावरच टाकल्या जातात
मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का ? असा सवाल करत भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या समाजसेविका अंजली दमानिया यांनी एकच खळबळ उडवून दिली. आज सकाळीच दमानिया यांनी X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर प्रश्न विचारला होता. तसेच त्यांनी भुजबळांवर कडाडून टीकाही केली होती.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली. ‘ भ्रष्टाचारी हेच भाजपाचा चेहरा आहेत’ अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. आधी अजित पवार, मग हसन मुश्रीफ, भावना गवळी.. एवढे सगळे नेते गेले. आता छगन भुजबळही भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा ऐकली.’ काय बोलणार, भ्रष्टाचारीच भाजपाचा चेहरा आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर कडाडून हल्ला चढवला. भाजपचा डाव सरळ आहे. जे भाजपासोबत जात नाहीत, त्यांच्यावर भाजप छापा टाकते. ईडीच्या धाडी त्यांच्यावरच टाकल्या जातात. मात्र जे भाजपसोबत जातात, त्यांना काहीच होत नाही, ते मोकळे राहतात, अशी टीकाही राऊत यांनी केली.
काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया ?
भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या समाजसेविका अंजली दमानिया यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. ‘भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का?’ असा प्रश्न त्यांनी X वर विचारला. “एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? असा त्यांचा सवाल आहे. अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशा बोचऱ्या शब्दात अंजली दमानिया यांनी भाजपावर टीका केली.