AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच उमेदवारी, कृपाशंकर सिंहांच्या नावावरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा

नितीन गडकरी यांच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता भाजपामध्ये दशकानुदशके आहे, पण त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. मात्र ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, असे म्हणत ठाकरेंनी भाजपावर हल्ला चढवला. तसेच जुमलाचं नामकरण आता गॅरेंटी झालंय पण जुमलेबाज गॅरेंटीला जनता पाठिंबा देणार नाही अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारलं.

ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच उमेदवारी, कृपाशंकर सिंहांच्या नावावरून उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा
| Updated on: Mar 03, 2024 | 1:32 PM
Share

मुंबई | 3 मार्च 2024 : आगामी लोकसभा निवणडणूकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. पण बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप त्या कृपाशंकर सिंह यांचं नाव या यादीत आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मुद्यावरून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे. नितीन गडकरी यांच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता भाजपामध्ये दशकानुदशके आहे, पण त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. मात्र ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, असे म्हणत ठाकरेंनी भाजपावर हल्ला चढवला. तसेच जुमलाचं नामकरण आता गॅरेंटी झालंय पण जुमलेबाज गॅरेंटीला जनता पाठिंबा देणार नाही अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारलं. शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

EVM च्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय. जनतेचा या सरकारला कौल नाही. पण जनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला.

मोदी, अमित शाहांचं नावही ऐकल नाही तेव्हापासून गडकरी..

नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं नावंही मी जेव्हा ऐकलं नव्हतं, तेव्हापासून मी नितीन गडकरी यांचं नाव ऐकत आलोय. त्यांच्यासोबत कामही केलं. भारतीय जनता पक्षाचे ते एक निष्ठावंत कार्यकर्त आहेत. त्यांनी मुंबई-पुणे रस्ता हे शिवसेनाप्रमुखांच स्वप्नही विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं. पण अशा (गडकरी) माणसाचं नाव भाजपच्या लोकसभा निवणडणूकीसाठीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाही. पण ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचे आरोप केले, त्या कृपाशंकर सिंह यांचा नाव मात्र भाजपच्या पहिल्या यादीत आहे. हीच आजची भारतीय जनता पार्टी आहे, ही त्यांची आजची स्थिती आहे, असा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.

अशी लोकं त्यांच्या विजयाची छातीठोक गॅरंटी देत असतील. गेल्या काही वर्षांत अनेक नाव बदलली, शहरांची नाव ( या सरकारने) बदलली. तसंच आतात जुमलाच नावही बदललंय. जुमलाचं नामकरण आता गॅरेंटी झालंय. पण या जुमेलबाज गॅरेंटीच्या विरोधात जनता आहे. त्यांना जनता पाठिंबा देणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी सुनावलं.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.