पूरग्रस्तांचं ओझं खांद्यावर, खासदार धैर्यशील मानेंनी ट्रकमधील पोती स्वतः उतरवली

हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या साहित्याची पोती ट्रकमधून स्वतःच्या खांद्यावरुन उतरवत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पूरग्रस्तांचं ओझं खांद्यावर, खासदार धैर्यशील मानेंनी ट्रकमधील पोती स्वतः उतरवली
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 9:58 AM

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगलीतील महापुराचं पाणी (Kolhapur Flood) ओसरत असलं, तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर कायम आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. माने स्वतः साहित्याची पोती ट्रकमधून उतरवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी नवीन कपडे, तांदूळ-डाळ असे खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू हे साहित्य पाठवलं. आमदार एकनाथ शिंदे आणि मुंबईतील शिवसैनिक दहा ट्रक घेऊन शिरोळ तालुक्यात गेले. त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी सर्वांच्याबरोबर प्रत्येक ट्रकमधील साहित्य स्वतः उतरुन घेतलं.

‘खासदार होऊन तीन महिने सुद्धा होत नाहीत, तोच खासदार म्हणून टाकलेली जबाबदारी खांद्यावर पेलली. एकनाथजी शिंदेंसोबत 5-6 दिवसांपासून धैर्यशील माने पूरग्रस्तांना मदत करत आहेत, लोक म्हणतील ते पुरवत आहेत.’ अशा शब्दात धैर्यशील माने यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

पूरग्रस्तांना जेवण पुरवलं जात असतानाच, धैर्यशील माने यांनी जनावरांचीही काळजी घेतली. पूरग्रस्त भागातील जनावरांना चारा, खाद्य मिळेल, याकडे धैर्यशील माने यांनी लक्ष पुरवलं होतं.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून मैदानात असलेले माजी खासदार राजू शेट्टी यांचा युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. धैर्यशील माने यांनी तब्बल 93 हजार 785 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतरही धैर्यशील माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत राजकारणातील नवा कोल्हापुरी पॅटर्न देशाला दाखवून दिला होता. थेट राजू शेट्टी यांचं घर गाठून त्यांच्या मातोश्रींचा आशीर्वाद मानेंनी घेतला होता.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.