आधी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात आग लावली अन् आता…; नितेश राणे यांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप
Nitesh Rane on Sanjay Raut : बेळगाववर बोलण्यापेक्षा पत्राचाळीवर बोला; नितेश राणे यांचं संजय राऊतांना आव्हान
सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काल बेळगावात गेले होते. कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिथे त्यांनी सभा घेतली. या सगळ्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. “संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर आहे. मोठया तावा-तावाने बोलतोय. मराठी बांधवांसाठी प्रचाराला गेलाय म्हणतोय. मी पुन्हा पुन्हा सांगतो की, हिंमत असेल तर पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल बोल.तुला मराठी माणसांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
संजय राऊतने आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आग लावली आणि आज सामनात आणि पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न केलाय.आज अग्रलेखातून परत सिद्ध झालय, आग लावण्याचे काम करतोय, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
संजय राऊत या शकुनी मामाला विचारायचं आहे. जुन्या गोष्टी विसरला असशील तर थोडं मुद्दामहून आठवण करून देतो. याच म्हणणं बेळगाव आंदोलनाशी भाजपचा काही संबंध नाही. संजय राजाराम राऊतने एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं…. बाळासाहेबांचं बेळगावसाठी आंदोलन सुरू होत तेव्हा तू कुठे होतास?सामनात होतास की लोकप्रभात?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
सरडा जसा रंग बदलतो तसा हा कारटा आहे. तेव्हा हा समाजवादी विचारसरणीचा होता.हिंदू विरोधात तेव्हा याने अनेक आर्टिकल लिहिली आहेत. तू लिहिले आर्टिकल एकदा वाचून दाखवणार आहे. मग तुला लोक चपलांनी मारतील, असा घणाघात नितेश राणे यांनी राऊतांवर केला आहे.
संजय राऊत प्रचाराला यायचा नसेल तर आमच्या उमेदवाराला ऑफर दिली गेली. आमच्या उमेदवाराने तिने ऑफर फेटाळली. जर ती ऑफर स्वीकारली असती तर हा आज बेळगावला गेला नसता. जसा मालक तसा कामगार, जसा कामगार तसा मालक. उद्धव ठाकरे याहून वेगळे नाहीत. संजय राऊक एक साधा संपादक आहे. तो मग एवढ्या गाड्या कुठून येतात? त्याच्या घरात लागलेल्या गाड्या बघा. एवढ्या महागड्या गाड्या वापरणारा दुसरा कुठला संपादक आहे. याचा ब्लॅकमेल हाच धंदा आहे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.