पिंपरीत शौचालयाच्या टाकीत सापडला अज्ञात मृतदेहाचा सांगाडा, पोलीस तपास सुरू

पिंपरीमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या पाणीच्या टाकीत अज्ञात मृतदेहाचा सांगाडा (Skeleton) सापडला आहे.

पिंपरीत शौचालयाच्या टाकीत सापडला अज्ञात मृतदेहाचा सांगाडा, पोलीस तपास सुरू
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 1:55 PM

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) गुन्ह्यांचे (Crime)अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरीमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या पाणीच्या टाकीत अज्ञात मृतदेहाचा सांगाडा (Skeleton) सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. टाकीमध्ये अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेची माहिती पोलिसांना (Police) देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Skeleton of an unidentified body found in a toilet tank in Pimpri)

पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर परिसरात काल रात्री हा प्रकार उघडकीस आला. परिसरातील काही स्थानिक नागरिक पाण्याच्या टाकीत असलेले मासे काढण्यासाठी पाण्यात उतरले. तेव्हा एका पोत्यात हा सांगाडा आढळला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं आणि घटनेची माहिती दिली.

हा मृतदेह कोणाचा आहे? आणि पाण्याच्या टाकीत कोणी टाकला ? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, पोत्यामधील मृतदेह हा पूर्णपणे सडला आहे. बऱ्याच दिवसांआधी मृत्यू झाला असावा. कारण, शरीराचा आता फक्त सांगाडाच शिल्लक असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी टाकीतून सांगाडा बाहेर काढला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अनेक गोष्टींचा उलगडा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

इतर बातम्या –

टोळी युद्धातून नागपूरमध्ये दोघांची हत्या?; मृतदेह रस्त्यावर फेकल्याने खळबळ

कल्याणमधील थरार! बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानावर दरोडा, 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास

(Skeleton of an unidentified body found in a toilet tank in Pimpri)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.