AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरा, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेला Realme स्मार्टफोन बाजारात

Realme GT NEO 2 बुधवारी भारतात लाँच करण्यात आला. Realme GTNEO2 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे.

12GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरा, खास गेमर्ससाठी डिझाईन केलेला Realme स्मार्टफोन बाजारात
Realme GT NEO 2
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 6:37 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Realme GT NEO 2 बुधवारी भारतात लाँच करण्यात आला. Realme GTNEO2 मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालणाऱ्या कोणत्याही स्मार्टफोनमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी आहे. Realme GTNEO2 हा डायमंड थर्मल-जेल वापरण्यात आलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. त्यात 20% डायमंड डस्ट असते, कारण हिरा हा इतर मटेरियलपेक्षा उत्तम थर्मल कंडक्टिव्ह मटेरियल आहे, ज्यामुळे 50% अधिक हीट ट्रान्सफर होते. या विशिष्ट्यामुळे हा फोन गेमिंगसाठी उत्तम असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. (Snapdragon 870 SoC, 120Hz AMOLED Display, Realme GT Neo 2 sale live on flipkart and reatil stores)

Realme GT NEO 2 स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरसह 4 Kryo 585 CPU द्वारे समर्थित आहे, जे 3.2Ghz वर परफॉर्म करते. फोटोग्राफीसाठी यामध्ये सर्वोत्तम कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रत्येक क्षण कॅप्चर करण्यासाठी, डिव्हाइसमध्ये 64 एमपी मेन कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सज्ज आहे.

रियलमी जीटी नियो 2 चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 2 मध्ये 6.62-इंच सुपर AMOLED डिस्प्ले 120hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 92.6 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 600 हर्ट्ज सॅम्पलिंग रेट, HDR10+ देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 12GB पर्यंत RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. यात 7GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील समाविष्ट आहे.

Realme GT Neo 2 ची किंमत आणि उपलब्धता

Realme GT Neo दोन व्हेरिएंटमध्ये येतो याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन आजपासून (17 ऑक्टोबर) फ्लिपकार्ट, रियलमी डॉट कॉम आणि ऑफलाइन स्टोअर्सवर देशभर उपलब्ध आहे.

इतर बातम्या

12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…

फेसबुकवर पोस्ट करताना विचार करा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई, पब्लिक फिगर्सवरील टीका रोखण्याचा कंपनीचा प्रयत्न

Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(Snapdragon 870 SoC, 120Hz AMOLED Display, Realme GT Neo 2 sale live on flipkart and reatil stores)

BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.