Zoom APP वर व्हिडीओ चॅट करत असलेल्या वडिलांची मुलाकडून हत्या, वेगवेगळ्या चाकूने 15 वार
अमेरिकेत एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली (Son Killed Father during video chat) आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेत एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली (Son Killed Father during video chat) आहे. ही धक्कादायक घटना 21 मे रोजी न्यूयॉर्क येथे घडली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. वडील आपल्या 20 मित्रांसोबत झूम अॅपवर व्हिडीओ चॅट करत असताना अचानक मुलाने आपल्या वडिलांवर चाकूने वार करत त्यांची हत्या केली. ड्वाईट पॉवर्स (72) असं मृत व्यक्तीचे नाव (Son Killed Father during video chat) आहे.
ड्वाईट पॉवर्स हे 21 मे रोजी आपल्या 20 मित्रांसोबत झूम अॅपवर व्हिडीओ चॅट करत होते. यावेळी अचानक त्यांच्या मुलाने त्यांच्यावर हल्ला केला आणि ते खुर्चीवरुन खाली पडले. तसेच ते व्हिडीओ कॉलच्या स्क्रनीनमधूनही गायब झाले.
हे पाहून व्हिडीओ कॉल सुरु असलेल्या मित्रांनी तातडीने पोलिसांना कॉल केला. कॉल केल्यानंतर पोलीस पॉवर्स यांच्या घरी पोहचल्यानंतर पाहिले तर पॉवर्स यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या शरीरावर चाकूने वार केलेले होते.
या प्रकरणानंतर पोलिसांनी व्हिडीओ कॉल सुरु असलेल्या त्यांच्या मित्रांकडे या प्रकरणाची चौकशी केली. मित्र म्हणाले, व्हिडीओ चॅट सुरु असताना पॉवर्सचा 32 वर्षाचा मुलगा थॉमस त्यांच्या रुममध्ये आला होता. त्यानंतर पॉवर्स हे खुर्चीवरुन खाली पडले. दरम्यान, या घटनेनंतर पॉवर्स यांच्या सर्व मित्रांमध्ये भीती निर्माण झाली होती.
वेगवेगळ्या चाकूने 15 वार
पॉवर्सच्या मित्रांच्या चौकशीनंतर पोलिसांनी थॉंमसला ताब्यता घेतले आणि चौकशी केली. त्यानंतर समजले की, मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केली. पोलिसांसमोर थॉमसने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगतिले की, किचनमधील वेगवेगळ्या चाकूने वडिलांवर वार करत त्यांची हत्या केली.
संबंधित बातम्या :
नागपुरात घरगुती वादातून मुलाकडून पित्याची हत्या
मुंबईहून साताऱ्याला आलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू, आई-वडील चार दिवस मुलाच्या मृतदेहासोबत राहिले
अंगणात खेळणाऱ्या मुलांचं भांडण, मोठ्यांचा हस्तक्षेप, सावत्र भावाची कुऱ्हाडीने हत्या