तिजोरी उघडा, गरजू कुटुंबांना दरमहा 7500 रोख द्या, सोनिया गांधींची मोदी सरकारकडे मागणी

लाखो मजुरांची तळमळ, त्यांचे दु:ख, त्यांचे हुंदके देशातील प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले, परंतु कदाचित सरकारला ऐकू गेले नाही, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला (Sonia Gandhi Criticizes Modi Government in Speak Up India Congress Movement)

तिजोरी उघडा, गरजू कुटुंबांना दरमहा 7500 रोख द्या, सोनिया गांधींची मोदी सरकारकडे मागणी
Follow us
| Updated on: May 28, 2020 | 4:31 PM

नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांच्या मुद्दावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा. गरजू कुटुंबांना सहा महिन्यांसाठी दरमहा 7 हजार 500 रुपये रोख रकमेच्या स्वरुपात द्या” अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. काँग्रेसच्या ‘स्पीक अप’ मोहिमेअंतर्गत पक्षाच्या देशभरातील नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. (Sonia Gandhi Criticizes Modi Government in Speak Up India Congress Movement)

“गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोना साथीच्या आव्हानाला समोरा जात आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले तीव्र आर्थिक संकट अनुभवत आहे. लाखो मजुरांना औषध-पाण्याविना शेकडो-हजारो किलोमीटर अंतर अनवाणी आणि उपाशीपोटी पार करावे लागले, हे पाहून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रत्येकाला इतक्या वेदना झाल्या. त्यांची तळमळ, त्यांचे दु:ख, त्यांचे हुंदके देशातील प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले, परंतु कदाचित सरकारला ऐकू गेले नाही.” असं सोनिया गांधी म्हणतात.

“कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले, लाखो व्यवसाय बुडाले, कारखाने बंद पडले, शेतकऱ्यांना धान्य विकायला उंबरे झिजवावे लागले. संपूर्ण देशाला त्रास सहन करावा लागला, परंतु कदाचित सरकारला याची जाणीव झाली नाही.” असंही पुढे सोनिया गांधी म्हणाल्या.

“तिजोरीचे कुलूप उघडून गरजूंना दिलासा द्यावा, असा आग्रह आम्ही पुन्हा केंद्र सरकारला करतो. प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिन्यांसाठी दरमहा 7,500 रुपये रोख द्यावी. त्यापैकी 10,000 रुपये त्वरित द्यावे. मजुरांच्या सुरक्षित आणि विनामूल्य प्रवासाची व्यवस्था करुन त्यांना घरी पोहोचवावे आणि त्यांच्या रेशन, पोटापाण्याची सोय करावी. महात्मा गांधी मनरेगामध्ये 200 दिवसाचे काम निश्चित करावे. ज्यामुळे खेड्यातच त्यांना रोजगार मिळू शकेल. सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज देण्याऐवजी आर्थिक मदत द्या, जेणेकरुन कोट्यवधी रोजगार वाचतील आणि देशाचा विकासही होऊ शकेल.” अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. (Sonia Gandhi Criticizes Modi Government in Speak Up India Congress Movement)

लॉकडाऊनच्या काळात काँग्रेसच्या मोदी सरकारकडे मागण्या : 

गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा, सोनिया गांधींची मागणी

सरकारने 2 वर्षे जाहिराती बंद कराव्यात आणि तो पैसा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी वापरावा : सोनिया गांधी

पुढील सहा महिने गरिबांना 10 किलो धान्य मोफत द्या, सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र

नियोजनशून्य लॉकडाऊनमुळे लाखो प्रवासी आणि मजुरांचं नुकसान, सोनिया गांधी मोदी सरकारवर भडकल्या

(Sonia Gandhi Criticizes Modi Government in Speak Up India Congress Movement)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.