Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Singing Star | ‘सिंगिंग स्टार’मध्ये अभिनयाचे ‘हे’ बारा शिलेदार उतरणार संगीताच्या मैदानात

अभिनयाचे एकूण बारा शिलेदार संगीताच्या मैदानात उतरणार आहेत. 21 ऑगस्टपासून दर शुक्रवार-शनिवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

Singing Star | 'सिंगिंग स्टार'मध्ये अभिनयाचे 'हे' बारा शिलेदार उतरणार संगीताच्या मैदानात
Follow us
| Updated on: Aug 15, 2020 | 5:31 PM

मुंबई : सोनी मराठी वाहिनीवर पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या ‘सिंगिंग स्टार- गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये 12 कलाकार सहभागी होणार आहेत. आस्ताद काळे, जुई गडकरी, अभिजित केळकर, गिरीजा ओक गोडबोले यासारखे प्रसिद्ध कलाकार यामध्ये झळकणार आहेत. (Sony Marathi Singing Star Musical Reality Show Contestants List)

अभिनयाचे एकूण बारा शिलेदार संगीताच्या मैदानात उतरणार आहेत. 21 ऑगस्टपासून दर शुक्रवार-शनिवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. दिग्गज अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे आणि गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी या कार्यक्रमाचे परीक्षक असतील. तर ‘फुलपाखरु’ मालिकेमुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेली अभिनेत्री हृता दुर्गुळे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात एकत्र झळकलेले आस्ताद काळे आणि जुई गडकरी या शोमध्ये दिसतील. तर दुसऱ्या पर्वातील अभिजित केळकरही सहभागी होणार आहे.

सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि अभिनेते उदय टिकेकर यांची कन्या स्वानंदी टिकेकरही यामध्ये सहभागी होणार आहे. स्वानंदीने दिल दोस्ती दुनियादारीमध्ये आपली छाप पाडली होती. तर तुला पाहते रे फेम पूर्णिमा डे हिचा गाता गळा ऐकायला मिळणार आहे.

दिग्गज अभिनेते प्रशांत दामले हे ‘सारेगमप’च्या गायक-अभिनेत्यांच्या पर्वाचे विजेते ठरले होते. त्या सिझनमध्ये त्यांच्यासोबत सहभागी झालेले अजय पुरकर, अभिजित केळकर आणि गिरीजा ओक गोडबोले यावेळीही स्पर्धक म्हणून दिसणार आहेत.

कोण कोण होणार सहभागी?

संकर्षण कऱ्हाडे – आम्ही सारे खवय्ये, खुलता कळी खुलेना स्वानंदी टिकेकर – दिल दोस्ती दुनियादारी यशोमान आपटे – फुलपाखरु अर्चना निपाणकर – का रे दुरावा, 100 डेज आरती वडगबाळकर – आज काय स्पेशल आस्ताद काळे – असंभव, बिग बॉस मराठी अजय पुरकर – असंभव जुई गडकरी – पुढचं पाऊल, बिग बॉस मराठी अभिजित केळकर – बिग बॉस मराठी पूर्णिमा डे – तुला पाहते रे अंशुमन विचारे – महाराष्ट्राची हास्यजत्रा गिरीजा ओक गोडबोले – लज्जा, मानिनी

(Sony Marathi Singing Star Musical Reality Show Contestants List)
View this post on Instagram

अभिनयाचे बारा शिलेदार संगीताच्या मैदानात उतरणार! पाहा, ‘सिंगिंग स्टार’ 21 ऑगस्टपासून, शुक्र.-शनि. रात्री 9 वा. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे . . . फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर. @sonymarathi @singingstar_2020_official #सिंगिंगस्टार #SingingStar #सोनीमराठी #SonyMarathi #विणूयाअतूटनाती #VinuyAatutNati

A post shared by Singingstar ?? (@singingstar_2020_official) on

(Sony Marathi Singing Star Musical Reality Show Contestants List)

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.