महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात आता विशेष कक्ष; उद्धव ठाकरे यांची घोषणा
राज्यात महिलांच्या विकासाला गती देण्याची आवश्यकता आहे. महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांचे प्रश्न आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
मुंबई : “राज्यात महिलांच्या विकासाला गती देण्याची आवश्यकता आहे. महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणे गरजेचे आहे. त्यामुळे महिलांचे प्रश्न आणि समस्यांचे निवारण करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच या कक्षामार्फत महिलांच्या योजनांना गती देणे, सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यावरही काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीत ठाकरे बोलत होते. (special desk in Chief Minister Office for solving women issues)
यावेळी, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “महिलांनी आता बचत गट आणि त्यांचे पारंपरिक पापड, मसाले या उद्योगांच्या पलीकडे जाऊन नवीन संधी शोधल्या पाहिजेत. महिलांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी उद्योगशीलतेत वाढ करत ‘विकेल ते पिकेल’ या धर्तीवर आधुनिक बाजारपेठेच्या मागणीशी सांगड घालावी लागेल. त्यासाठी माविम, उमेदच्या (राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान) उपक्रमांना व्यापक स्वरुप द्यावे लागेल. तसेच, महिलांच्या प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीचे कार्यक्रम अधिक गतीने हाती घ्यावे लागतील.”
बचतगटांची उत्पादने ऑनलईन विक्री प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्याची मागणी
एनआरएलएमने बचतगटांची उत्पादने ॲमेझॉन सारख्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. याच धर्तीवर माविम स्वत:चे ई-बिझनेस प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. पण यासाठी महिलांनी निर्माण केलेल्या उत्पादनांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर व्यापक प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. महिला बचत गटातर्फे उत्पादित वस्तूंना ‘दिल्ली मार्ट’च्या धर्तीवर जागोजागी मार्ट उभारली जावीत अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा ज्योती ठाकरे, जल जीवन मिशनच्या संचालक आर. विमला, माविमच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ, माजी महापौर विशाखा राऊत, गीता कांबळी, संगीता हसनाळे, रंजना मेवाळकर आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
क्रेडिट घेण्यासाठीच लोकल सुरू करण्यास टाळाटाळ; वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर आरोप
पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर, माजी सैनिक पत्नींच्या महिला बचत गटातर्फे धावणार 44 बसेस
Diwali Guidelines 2020 | दिवाळी पहाट आणि फटाक्यांना बंदी, राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी
(special desk in Chief Minister Office for solving women issues)