आर्थिक संकटातून बाहेर निघायचे आहे? मग आठवड्यातून फक्त दोनदा करा ‘हा’ उपाय

बऱ्याचदा भूतकाळातल्या काही चुकांमुळे वर्तमानात त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपल्यावर येणारे आर्थिक संकट हेसुद्धा यातलाच एक भाग आहे. भूतकाळात जात चुका दुरुस्त करणे जरी शक्य नसले तरी वर्तमानात काही उपाय केल्यास या समस्येतून मार्ग निघू शकतो.

आर्थिक संकटातून बाहेर निघायचे आहे? मग आठवड्यातून फक्त दोनदा करा 'हा' उपाय
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 7:55 PM

बऱ्याचदा अनेक उपाय (remedy) करूनही आर्थिक संकटं (financial crices) कायम असतात. प्रत्येकाच्या आर्थिक समस्येला (financial crices) वेगवेगळी करणे असू शकतात, मात्र हिंदू धर्मात यावर यावर काही उपाय

( get rid out) सुचविले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मानुसार आठवड्यातला प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णूला तसेच देवी लक्ष्मीला समर्पित आहे.  या दिवशी लक्ष्मीची पूजा आणि तिचे स्मरण केल्याने जातकावर लक्ष्मी प्रसन्न राहते. याशिवाय शुक्रवार हा महालक्ष्मीचाही दिवस आहे. मान्यतेनुसार आठवड्यातील या दोन दिवशी भगवान विष्णूसोबत महालक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी मिळते. यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी कोणते उपाय केल्याने लाभ मिळेल, याबद्दल जाणून घेऊया.

जाणून घ्या उपाय

  1. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करा. कमळाचे फुल लक्ष्मीचे आवडते आहे त्यामुळे ते अर्पण करा. असे केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होईल.
  2. शक्य असल्यास लक्ष्मीच्या किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. आर्थिक संकातून बाहेर निघायचा मार्ग निघण्यासाठी प्रार्थना करा.
  3. गुरुवारी आणि शुक्रवारी एकवेळचा उपवास करा.
  4. गुरुवारी आणि शुक्रवारी श्री सूक्त आणि विष्णू सहस्रनामाचे पठण करा. या उपायाने आर्थिक संकटांशिवाय आरोग्याशी संबंधित आणि नात्यांशी संबंधित समस्यांवरही लाभ मिळतो.
  5. धन हानीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या एका बाजूला थोडासा गुलाल टाका  व त्यावर तुपाचा चारमुखी दिवा लावा. दिवा लावताना मनात म्हणा की ‘हे लक्ष्मी माते धनहानीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी मार्ग दिसू दे’. दिवा विझल्यावर तो वाहत्या पाण्यात विसर्जित करावा.

(वर दिलेली माहिती ही धार्मिक दृष्टिकोनातून दिलेली आहे. अंधश्रद्धा पररविण्याचा कुठलाही उद्देश नाही)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.