शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी, रियासह तिघांची एकत्रित चौकशी

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबर कोठडी सुनावली आहे. (Showik Chakraborty And  Samuel Miranda In NCB custody)

शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी, रियासह तिघांची एकत्रित चौकशी
Follow us
| Updated on: Sep 05, 2020 | 4:41 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेला रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा मॅनेजर  सॅम्युअल मिरांडाला एनसीबीने या दोघांना एनसीबीने काल (4 सप्टेंबर) अटक केली होती. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांना चार दिवसांची म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. (Showik Chakraborty And  Samuel Miranda In NCB custody till 9 September)

तर न्यायालयाने ड्रग पेडलर कैजानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तीनही आरोपींना चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात नेले जाणार आहे. यावेळी आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. ड्रग्स कोणी खरेदी केले? यासाठी पैसे कोण देत होते? किती पैसे दिले गेले? किती ड्रग्ज खरेदी करण्यात आले? यासर्व गोष्टींची चौकशी केली जाईल. तसेच रियाचा याप्रकरणी काय संबंध होता? याचीही चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने कैजानची कोठडी मागितलेली नाही. याआधी कोर्टाने ड्रग पेडलर जैद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यामुळे सध्या शोविक, सॅम्युअल मिरांडा, जैद विलात्रा, अब्दुल बासित परिहार हे चौघेजण एनसीबीच्या कोठडीत आहेत.

तसेच उद्या (6 सप्टेंबर) रिया चक्रवर्तीला एनसीबीने चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. यावेळी रिया, शोविक आणि सॅम्युअल या तिघांची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे. (Showik Chakraborty And  Samuel Miranda In NCB custody till 9 September)

एनसीबीचे अधिकारी मुथा अशोक जैन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, “मी याप्रकरणी जास्त काही सांगू शकत नाही. एनसीबी या प्रकरणी आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय कनेक्शनवर लक्ष देत आहे. शोविक आणि सॅम्युल या दोघांना चौकशीसाठी कोठडीत घेण्यात आले आहे. त्यासोबत या प्रकरणी इतर लोकांनाही चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे.”

? कसे आहे ड्रग कनेक्शन ?

➡️28 ऑगस्टला अब्बास रमजान लखानीला अटक ➡️21 वर्षीय लखानीकडून 46 ग्रॅम गांजा जप्त ➡️लखानीच्या माहितीवरुन कर्ण अरोराला अटक ➡️कर्ण अरोराकडून 13 ग्रॅम गांजा जप्त ➡️लखानी आणि अरोराच्या माहितीवरुन झैद विलात्रास अटक ➡️झैदकडून 9 लाख 55 हजार 750 रुपये रोख रक्कम जप्त ➡️झैदकडून 2081 डॉलर्स, 180 पौंड, 15 दिनार चलन जप्त ➡️सर्व रक्कम ड्रग्ज विक्रीची असल्याची झैदची कबुली ➡️अब्देल बासित परिहारला झैदच्या माहितीवरुन अटक ➡️झैद आणि कैझान इब्राहिमकडून परिहार गांजा घ्यायचा ➡️परिहार शौविक चक्रवर्तीसाठी गांजा खरेदी करायचा ➡️परिहार शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला ड्रग्जही द्यायचा ➡️परिहारच्या स्टेटमेंटवरुनच शौविकला समन्स पाठवून अटक

NCB कोठडी घेऊन काय करणार ?

1) शौविक आणि अटकेतल्या इतरांची एकत्र चौकशी करणार 2) ड्रग्ज व नार्कोटिक्सच्या खरेदी-विक्रीचे नेटवर्क शोधणार 3) शौविकची रिया व दिपेश सावंतला घेऊन एकत्रित चौकशी 4) ड्रग्ज खरेदीसाठीचे आर्थिक व्यवहार तपासून पाहणार 5) CDR,वॉट्सअप चॅट व चौकशीतील नावांची खातरजमा करणार 6) CDR मधील फरार व्यक्तींचा शोध घेणार

हेही वाचा –Kangana Ranaut | मुंबईनं मला यशोदा आईसारखं स्वीकारलं, मुंबई माझी कर्मभूमी, कंगनाला उपरती

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली आहे. सुशांत सिंह प्रकणात ड्रग्जचे धागेदोरे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने मोठी कारवाई करत रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली होती. भावाच्या अटकेनंतर आता रियाच्या अडचणीही वाढणार आहेत. एनसीबी रियालाही समन्स बजावण्याची शक्यता आहे.

सुशांत प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या एनसीबीने आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतलं. त्यापैकी 2 जणांना जामीन मिळाला आहे. इतरही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना एनसीबी समन्स पाठवण्याची शक्यता आहे. (Showik Chakraborty And  Samuel Miranda In NCB custody till 9 September)

संबंधित बातम्या :

सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक

सीबीआयच्या चौकशीत रिया-शौविक ड्रग्ज सेवन करत असल्याचा दावा, श्रुती मोदीला एनसीबीच्या समन्सची शक्यता

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.