राज्य सरकारचं सैन्य दलाला पत्र, कोरोनाला रोखण्यासाठी मिलिट्रीची मदत
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून लॉक डाऊन घोषित करण्यात (Ajit Pawar on Military medical help) आला आहे.
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून लॉक डाऊन घोषित करण्यात (Ajit Pawar on Military medical help) आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्नही केले जात आहे. त्यासोबत राज्य सरकारने सैन्य दलाची मदत मिळावी यासाठी पत्र लिहिले आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar on Military medical help) दिली.
अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारने सैन्य दलाला पत्र लिहिले आहे. सैन्य दलाची गरज लागल्यास वैद्यकीय मदत मिळावी. यासाठी आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.”
“व्यापारी कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षही बाजारात विकू शकतात. त्यासोबत गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मच्छीही विकता येणार आहे. विक्रेत्यांनी फक्त विक्री करताना काळजी घ्यावी. तसेच पेट्रोल आणि डिझेल हे फळभाज्या आणि फळांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दिले जाणार आहे, असंही अजित पवार यांनी सांगितले.
“शेतकरी कर्जमाफी योजनेच्या कामाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. शेतकरी बायोमेट्रिकसाठी तयार नसल्यामुळे काम थांबले आहे. सध्या प्राधान्य कोरोनाच्या कामाला दिले जात आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
“हॉटेलमधून जेवण डिलिव्हरी मिळणार आहे. पण डिलिव्हरी बॉयने योग्य ती काळजी घ्यावी. त्यासोबत साखर कारखान्यात ऊस गाळपाला आणावा. ऊसतोड मजूर येतील त्यांच्या जेवणाची काळजी कारखानदारांनी घ्यावी”, असं अजित पवारांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महाराष्ट्रात एकूण 130 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.