साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, अशी मागणी केली. | Sugercane FRP

साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 8:15 PM

कोल्हापूर: यंदाच्या गाळप हंगामातील ऊसाचे दर निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, अशी मागणी केली. मात्र, साखर कारखानदारांनी ही मागणी नाकारली. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बैठकीतून निघून गेले. त्यामुळे ऊसदर निश्चितीसाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली. मात्र, ऊसासाठी एफआरपी वाढवून देणार नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरु होऊन देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. (Sugarcane FRP first meeting in Kolhapur)

ही बैठक निष्फळ ठरली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना एकरकमी देवू अस आश्वासन दिले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीचे तुकडे होणार नाहीत. ही सकारात्मक बाब असली तरी तोडणी, ओढणी प्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीमध्ये 14 टक्के वाढ मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव मजुरीसाठी ऊसतोड कामगार आणि वाहतुकदारांचा संप सुरु होता. अखेर पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला होता. या बैठकीअंती ऊसतोड कामगार आणि वाहतूकदारांना मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय झाला होता. या बैठकीला धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, सुरेश धस हे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बहुतांश ऊसतोड मजुरांच्या संघटनांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शविली होती.

मात्र, अतिवृष्टीच्या फटक्यामुळे ऊसतोडणीला अजून वेगात सुरुवात झालेली नाही. काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. परिणामी या शेतांमधील ऊस तोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या रस्त्यांलगत असलेल्या शेतांमधील ऊस कापण्याचे काम सुरु आहे. मात्र, यंदाचा गाळप हंगाम अगोदरच लांबणीवर पडला आहे. दरवर्षी साधारण 15 ऑक्टोबरच्या आसपास गाळप हंगामाला सुरुवात होते. मात्र, यंदा अडचणींमुळे गाळप हंगाम अजूनही सुरु झालेला नाही.

बैठक निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ होताच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जवाहर साखर कारखाना आणि बाबवडे साखर कारखान्याचा ऊस रोखण्यात आला. यावेळी उमळवाड फाटा येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक आणि ट्रॅक्टरचे टायर्स जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित बातम्या:

मोठी बातमी: ऊसतोड मजुरांचा संप स्थगित; सुरेश धस यांची घोषणा

(Sugarcane FRP first meeting in Kolhapur)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.