Corona : सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण
सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेते चिरंजीवी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिरंजीवी यांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
हैदराबाद : दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) कोरोनाबाधित (Corona Positive) आढळले आहेत. चिरंजीवी यांनी स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. चिरंजीवी यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘आचार्य’च्या चित्रीकरणापूर्वी कोरोना चाचणी (Corona Test) केली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चिरंजीवी यांनी सांगितले की, अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मी स्वतःला क्वारन्टाईन केले आहे.
चिरंजीवी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मी आगामी चित्रपट ‘आचार्य’चं चित्रीकरण करणार होतो. त्यापूर्वीच मी माझी कोरोना चाचणी करुन घेतली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. मी स्वतःला क्वारन्टाईन केले आहे. गेल्या चार-पाच दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले होते त्यांनीदेखील कोरोना चाचणी करुन घ्यावी. मी वेळोवेळी माझ्या तब्येतीची माहिती देत राहीन”.
ఆచార్య షూటింగ్ ప్రారంభించాలని,కోవిడ్ టెస్ట్ చేయించుకున్నాను. రిజల్ట్ పాజిటివ్. నాకు ఎలాంటి కోవిడ్ లక్షణాలు లేవు.వెంటనే హోమ్ క్వారంటైన్ అయ్యాను.గత 4-5 రోజులుగా నన్ను కలిసినవారందరిని టెస్ట్ చేయించుకోవాలిసిందిగా కోరుతున్నాను.ఎప్పటికప్పుడు నా ఆరోగ్య పరిస్థితిని మీకు తెలియచేస్తాను. pic.twitter.com/qtU9eCIEwp
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) November 9, 2020
जगभरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या
भारतातील कोरोनबाधितांची संख्या आता 85,55,109 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 1,26,671 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 79,17,373 नागरिक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच सध्या 5,11,065 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर जगभरात आतापर्यंत 5 कोटी 8 लाख 9 हजार 985 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 12,63,058 बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच अमेरिकेमध्ये आतापर्यंत 1,02,88,480 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
…तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते; मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (08 नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या आगामी संकटाची चाहूल दिली. दिवाळीचा सण प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून हा उत्सव साधेपणाने आणि आनंदाने साजरा करा. सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आतू येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या
Ramdas Athawale | रामदास आठवले कोरोनामुक्त, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश : मुख्यमंत्री
(Superstar Chiranjeevi tested positive for coronavirus, under home quarantine)