AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चप्पूवरून प्रवास करताना तिघांचा मृत्यू, त्याच चप्पूवरुन प्रवास करून आमदार धस यांचा कुटुंबाला धीर

आज सुरेश धस यांनी वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव इथं भेट देऊन जिवाची परवा न करता थेट चप्पूवरून प्रवास करून घटनास्थळाची पाहणी केली

चप्पूवरून प्रवास करताना तिघांचा मृत्यू, त्याच चप्पूवरुन प्रवास करून आमदार धस यांचा कुटुंबाला धीर
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 8:36 PM

बीड : आमदार सुरेश आण्णा धस हे नेहमीच त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत असतात. आताही अशीच घटना समोर आली आहे. आज सुरेश धस यांनी वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव इथं भेट देऊन जिवाची परवा न करता थेट चप्पूवरून प्रवास करून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. (Suresh Dhas journey from paddle in beed )

खळवट लिंबगाव ता.वडवणी इथं एकाच कुटुंबातील तीन जणांचा माजलगाव धरणातील बॅक वॉटरवरून चप्पू पलटी झाल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेकडे प्रशासनाचं लक्ष नसल्यानं गावकऱ्यांनी संतप्त होऊन 24 ऑक्टोबर रोजी वडवणी तहसील कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढून आंदोलन केलं होतं.

यानंतर आज या गावात आमदार सुरेश धस यांनी या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चप्पूवरून प्रवास करून सुरेश धस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सर्व ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात प्राणिकपणे मुद्दा उपस्थित करेन असाही शब्द त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला.

तब्बल 14 दिवसानंतरही या कुटुंबाला सरकारच्यावतीने प्रशासनाने कुठलीही मदत केली नाही. मदत व पुनर्वसन खात्याच्या शासन निर्णयाप्रमाणे मायनस ट्रेझरीमधून तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मदत देण्याचा अधिकार असतानाही दिरंगाई केल्यामुळे या प्रकरणात जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर खडक कारवाई करण्याची मागणीही आमदार सुरेश आण्णा धस यांनी केली आहे.

दरम्यान, वडवणी इथं एकाच कुटुंबातील पाच जण माजलगाव धरणातील बॅक वॉटरवरून पूल नसल्यामुळे चप्पूवरून आपल्या शेतातून घरी येत होते. यावेळी चप्पू पलटी झाल्यामुळे पाचही जण पाण्यात बुडाले. त्यापैकी आर्यन भारत फरताडे, पूजा राजाभाऊ काळे, सुशीला भारत फरताडे या तिघांचा यामध्ये मृत्यु झाला होता.

इतर बातम्या – 

उल्लासनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकचालकाने 5 ते 6 दुचाकींना उडवलं; पाहा CCTV व्हीडिओ
मोठी बातमी: पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णव गोस्वामींचा दावा कोर्टाने फेटाळला

(Suresh Dhas journey from paddle in beed )

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....