Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेली सीबीआय टीम अॅक्शन मोडमध्ये आहे. Sushant Singh Rajput death CBI probe live
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेली सीबीआय टीम अॅक्शन मोडमध्ये आहे. सीबीआय पथकाने कालपासून तपासाला सुरुवात केली आहे. आज सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात तर दुसरी टीम वांद्रे पोलीस स्थानकात दाखल झाली. त्याआधी सीबीआयची फॉरेन्सिक टीमही मुंबईत दाखल झाली. डीआरडीओ इथे सीबीआयचं तात्पुरतं कार्यालय आहे. आज मुंबईत दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीम आपली कारवाई सुरु करणार आहे. (Sushant Singh Rajput death CBI probe live)
सीबीआय पथकाकडून कूपर रुग्णालयातील डॉक्टरांची विचारपूस करण्यात येणार आहे. ज्या डॉक्टरांनी सुशांत सिंहच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं, त्यांची चौकशी केली जाणार आहे.
रिया चक्रवर्तीच्या चौकशीची शक्यता दरम्यान सुशांत सिंह राजपूत आत्महत्या खटल्यात सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौकशी करु शकते. रिया सध्या तिच्या मुंबईतील घरी आहे. रियाला अद्याप चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही. त्याआधी सीबीआयने काल रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची चौकशी केली.
पुतळा लटकवून सीन रिक्रिएट करणार
सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा घरात फासावर लटकवून सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. (CBI to recreate Sushant Singh Rajput Suicide Crime Scene)
सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमकं अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची सीबीआय खातरजमा करणार आहे. सीबीआयची टीम आज सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे.
फॉरेंसिक टीम सीबीआयसोबत असेल. पोस्टमार्टेम, विसेरा, घरात उपस्थित असलेले चार साक्षीदार या सगळ्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.
सीबीआयच्या दोन टीमकडून विभागणी करुन चौकशी
या पार्श्वभूमीवर सीबीआयने दोन टीममध्ये विभागणी केली आहे. यातील एक टीमने वांद्रे पोलीस ठाण्यातून चौकशीसाठी दाखल झाली आहे. त्यांनी सुशांतची डायरी आणि इतर दस्तावेज ताब्यात घेतले आहे. तसेच सुशांतचा फोन आणि लॅपटॉपही ताब्यात घेतले आहेत. यातील एक टीम ही एसपी अनिल यादव लीड करत असून वांद्रे पोलीस ठाण्यात तपास करत आहे. तर दुसरी टीम ही एसपी नुपूर यादव लीड करत आहे. ही टीम फॉरेन्सिक विश्लेषण करणार आहे.
त्याशिवाय सीबीआयच्या टीमने सुशांतच्या मृत्यूदिवशी घटनास्थळी उपस्थिती असलेल्या सर्व साक्षीदारांना बोलवलं आहे. तसेच सुशांतच्या रुमचा दरवाजा उघणाऱ्या व्यक्तीलाही बोलवण्यात आले आहे.
सुशातंचा मित्र संदिप सिंहचीही चौकशी?
सुशांत सिंह राजपूतच्या तपासात सुशांतचा मित्र म्हणवणारा संदिप सिंह याचीही चौकशी सीबीआय करणार आहे. संदिप सिंह हा 14 जूनला पोस्टमार्टेम रुम आणि कूपर रुग्णालयात नितू लिंहसोबत वारंवार गेला होता. नितू लिंह सोबत त्याने फोटोही काढला होता. सुशांतचा तो जवळचा मित्र असल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं होतं. त्याची दिनचर्या काय होती, तो सुशांतला कधीपासून ओळखतो, त्याच्यासोबत झालेले चॅट, त्याचे इतरांशी झालेल्या चॅट्सची, कॉल्सची चौकशी होणार आहे. संदिप सिंह याचा सुशांत आत्महत्या प्रकरणात वापर झालाय का?, त्याने काही फाऊल प्ले केला आहे का याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(Sushant Singh Rajput death CBI probe live)
संबंधित बातम्या
सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा फासावर, सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार