सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ‘ऑफलाईन’, सोशल मीडियावरुन ब्रेक

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती यांनी सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. (Sushant's Sister Shweta Singh Kirti took break from Social media)

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती 'ऑफलाईन', सोशल मीडियावरुन ब्रेक
Follow us
| Updated on: Sep 17, 2020 | 12:47 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करत होत्या. मात्र आता एक पोस्ट लिहित श्वेता यांनी आपण सोशल मीडियापासून 10 दिवसांचा ब्रेक घेत असल्याचे म्हटलं आहे. भावाला गमावल्यानंतर त्या दु:खातून स्वत:ला सावरण्यासाठी आपण हा ब्रेक घेत असल्याचे श्वेता सिंह यांनी म्हटलं. (Sushant’s Sister Shweta Singh Kirti took break from Social media)

श्वेता सिंह यांनी इन्स्टाग्रामवर सुशांत सिंह राजपूतसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत श्वेता यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “सुशांत आता आमच्यात नाही, त्याला आता परत कधीच स्पर्श होऊ शकणार नाही. त्याचा तो हसरा चेहरा सुद्धा बघता येणार नाही. एव्हढंच नाही तर त्याने केलेले जोकसुद्धा आता ऐकता येणार नाहीत. हा खूप मोठा फटका आहे, यातून बाहेर येणे सोपे नाही. पुढील 10 दिवस सोशल मीडियापासून दूर राहून या दु:खातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेन”, असं श्वेता सिंह किर्ती यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अनेक वादविवाद झाले. सध्या सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्येपासून श्वेता किर्ती या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होत्या. त्यांनी #JustiseforSSR #WeStayUnited4SSR असे अनेक हॅशटॅग वापरुन आपल्या भावना मांडल्या होत्या.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी NCB ने सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती यांनी एनसीबी (NCB) ने अटक केली आहे. तर पुढील तपास सीबीआय (CBI) करत आहे. (Sushant’s Sister Shweta Singh Kirti took break from Social media)

संबंधित बातम्या  

Sushant Singh Rajput Suicide case | DCP अभिषेक त्रिमुखेंना कोरोनाची लागण, कुटुंबालाही बाधा 

Sushant Singh Rajput | सुशांतसिंह प्रकरणी CBI कडून दोन पोलीस अधिकाऱ्यांना समन्स 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.