ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप

जमील शेख (Jameel Sheikh) यांच्या मृत्यूमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर ही हत्या की अपघाती मृत्यू याविषयी पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 7:28 PM

ठाणे : ठाण्यात मनसे (MNS) पदाधिकारी जमील शेख यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या राबोडी परिसरात बाईक शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला. जमील शेख (Jameel Sheikh) यांच्या मृत्यूमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर ही हत्या की अपघाती मृत्यू याविषयी पोलीस तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Suspected death of MNS office bearer in Thane allegation of shooting in the head)

मिळालेल्या माहितीनुसार, राबोडी परिसरात बाईक शेजारी जमील शेख यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात जमील यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. तर बाईकवरून पडून अपघाती मृत्यू झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामुळे नेमका जमील शेख यांचा मृत्यू कसा झाला यावरून परिसरात संभ्रम आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून जमील शेख यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, जमील शेख यांच्या मृत्यूविषयी विचारलं असता पोलीस याबाबत काहीही बोलण्यास तयार नाही आहेत.

अधिक माहितीनुसार, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच जमील शेख यांची हत्या की अपघाती मृत्यू याचा उलगडा होईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून जमील यांची बाईकदेखील ताब्यात घेतली असून स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची या प्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या –

‘असंच काम करा, आम्हाला बोलावं लागणार नाही’, मनसे आमदार राजू पाटलांचा टोला

सुपारी घेतल्याशिवाय मनसे कामच करू शकत नाही, त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून; अनिल परब यांचा घणाघात

(Suspected death of MNS office bearer in Thane allegation of shooting in the head)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.