“आई-बहिणीसाठी दिवस ढकलत राहिले, पण…” सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ, चित्रपट अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न

विजयालक्ष्मीला चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

आई-बहिणीसाठी दिवस ढकलत राहिले, पण... सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ, चित्रपट अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 9:34 AM

चेन्नई : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री विजयालक्ष्मी हिने रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आहे, असा इशारा देणारा व्हिडिओ तिने आधी शेअर केला, सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने तिचे प्राण वाचले आहेत. (Tamil actor Vijaya Lakshmi attempts suicide rushed to hospital)

विजयालक्ष्मीला चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. नाम तमिझर पक्षाचे नेते सीमन आणि त्यांच्या समर्थकांनी मानसिक छळ केल्याचा आरोप विजयालक्ष्मीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत केला.

सीमन आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांकडून सतत होणारी गुंडगिरी आणि छळ यामुळे आपण गेल्या काही महिन्यांपासून खूप तणावाखाली होतो, असे तिने सांगितले. मतभेदांमुळे छळ केल्याबद्दल सीमन आणि हरी नादर यांना अटक करावी, अशी विनंतीही तिने केली आहे.

विजयालक्ष्मीने 1997 मध्ये नागमंडल या कन्नड चित्रपटातून पदार्पण केले. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअरही मिळाला आहे. विजय, सूर्या, मोहनलाल, प्रकाशराज यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसह तिने काम केलं आहे. वीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने 40 पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

विजयालक्ष्मी व्हिडीओमध्ये काय म्हणाली?

“हा माझा शेवटचा व्हिडिओ. सीमन आणि त्याच्या पक्षातील माणसांमुळे गेल्या चार महिन्यात मी प्रचंड तणावात आहे. मी माझ्या आई आणि बहिणीसाठी जगण्याचा प्रयत्न केला. हरी नादर यांनी प्रसारमाध्यमांमध्ये माझा अपमान केला आहे. मी बीपीच्या गोळ्या घेतल्या आहेत. काही काळात माझं बीपी कमी होईल आणि माझा मृत्यू होईल” असं विजयालक्ष्मीने रविवारी पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे..

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“माझा मृत्यू प्रत्येकासाठी डोळे उघडणारा ठरावा. आता मला कोणाचीही गुलामी करण्याची इच्छा नाही” असेही तिने म्हटले. सुदैवाने वेळीच मदत मिळाल्याने विजयालक्ष्मीचे प्राण बचावले आहेत.

(Tamil actor Vijaya Lakshmi attempts suicide rushed to hospital)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.