Navratri 2020 | मंदिरं सुनसान, भाविकांचं बाहेरुनच दर्शन, व्यावसायिकांचं नुकसान
भाविकांविना मंदिरे सुनसान आहेत (Temples closed devotees visit from outside and return)
वर्धा : नवरात्रोत्सवात सर्वत्र उत्साह, धामधूम पाहायला मिळते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होतोय. भाविकांविना मंदिरे सुनसान आहेत. वर्धा जिल्ह्याच्या महाकाळी इथे आलेले भाविक बाहेरुनच दर्शन घेऊन परत जात आहेत. मंदिर प्रवेशास परवानगी नाकारल्यानं किरकोळ व्यावसायिकांचही नुकसान होत आहे (Temples closed devotees visit from outside and return).
वयाची साठी पार केलेल्या तुळसाबाई मांढरे या महाकाळी इथं मंदिराजवळ मंडप टाकून तयार केलेल्या छोट्याशा दुकानात पूजेच साहित्य, चिवडा विकून आपला उदरनिर्वाह करतात. पण कोरोनाने सारं विस्कटून टाकलं. नवरात्रीतही दुकान बंद असल्याने कसं जगायचं, असा प्रश्न तुळसाबाईसारख्या हजारो जणांपुढं निर्माण झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातील महाकाळी मंदिर विदर्भात प्रसिद्ध आहे. जलाशयाला लागून असलेल्या मंदिराचा परिसर निसर्ग सौंदऱ्याने नटलेला आहे. इथे जिल्हा परिषदेचं पुनर्वसित आणखी एक मंदिर आहे. पण यंदा मंदिराचे गाभारे, प्रवेशद्वार बंद असल्याचं चित्र आहे (Temples closed devotees visit from outside and return).
मंदिरात दैनंदिन पूजा, आरती होते. नवरात्रोत्सवात दररोज शेकडो भाविकांची गर्दी राहायची. तिथं आता अपवादाने भाविक येतात. मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेत भाविक परतात. यंदा इथले महाप्रसाद, कोजागिरी उत्सव असे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमध्ये दुकान बंद राहिली. नवरात्रीच्या अनुषंगाने त्यांनी काही हजारापर्यंतचा माल दुकानात भरला. पण, त्यांना दुकानच उघडण्याची परवानगी प्रशासनाकडून नाकारण्यात आली. याशिवाय भाविकही येत नाहीत. अखेर विक्री होत नसल्याने मोठा माल खराब झाला. त्याचबरोबर नव्याने आणलेला मालही खराब होण्याची शक्यता आहे.
सगळं काही अनलॉक होत असताना मंदिर मात्र अद्यापही उघडण्यास परवानगी नाही. त्यामुळे मंदिराबाहेर दुकान लावून उदरनिर्वाह करणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मंदिरे कधी उघडणार, किरकोळ विक्रेत्यांना रोजगार कसा मिळणार, असे प्रश्न विचारले जात आहेत.
संबंधित बातम्या :
राज्यात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, मंदिर ओस, भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन