ठाकरे सरकार कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारणार, मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना जागा हस्तांतरित करण्याचा आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हा रुग्णालय परिसरातच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आदेश दिले (Thackeray government to set up medical college in Konkan).
मुंबई : सिंधुदुर्गच्या ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज (9 नोव्हेंबर) सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती (Thackeray government to set up medical college in Konkan).
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे आदेश दिले. “वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात आणि जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे होईल. सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नावाने असलेली जमीन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तर वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करावा”, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
“भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग 20 एकर जागा असणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी आवश्यक असणारी जागा आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जागा त्वरित हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी”, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले.
“कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी”, अशी मागणी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत बैठकीदरम्यान केली (Thackeray government to set up medical college in Konkan).
या बैठकीला उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, वैद्यकीय शिक्षण सचिव संजय कुमार, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
ना फटाके, ना हलगर्जी, दुसरी लाट थोपवण्यास BMC सज्ज, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, फक्त लक्ष्मीपूजनाला फुलबाजांना परवानगी