मेडिकल रिसर्चच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणींना डांबून ठेवलं, जबरी ध्यानधारणा, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

उच्चशिक्षित असलेल्या आठ ते दहा तरुणींना एका एनजीओने ठाण्यातील येऊर परिसरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मेडिकल रिसर्चच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणींना डांबून ठेवलं, जबरी ध्यानधारणा, ठाण्यातील धक्कादायक प्रकार
Follow us
| Updated on: Sep 10, 2020 | 9:42 PM

ठाणे : उच्चशिक्षित असलेल्या आठ ते दहा तरुणींना एका एनजीओने ठाण्यातील (Thane Crime NGO) येऊर परिसरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणींना ऑनलाइन पोर्टलवरुन मेडिकल रिसर्च करण्याच्या नावाखाली जॉब देण्याचे आमिष दाखवून ठाण्यात बोलवण्यात आले होते. मात्र, कुठल्याही प्रकारे मेडिकल रिसर्चचे काम या तरुणींना न देता त्यांना दिवसभर एका खोलीत डांबून ठेवण्यात येत होते. त्यांना जबरदस्तीने मेडिटेशन करण्यास भाग पाडण्यात येत होते, असा आरोप या तरुणींनी केला आहे (Thane Crime NGO).

ज्या खोलीत या तरुणी राहत होत्या. तेथे अनेक छुपे कॅमेरे लावण्यात आले होते, असे देखील या तरुणींनी सांगितले. दरम्यान, या तरुणींपैकी काहींनी या घटनेची खबर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने या तरुणींची बुधवारी सायंकाळी सुटका केली. त्यानंतर या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरु होते.

ठाण्यातील येऊर भागात कार्यालय असलेल्या सुपर वाशी फाउंडेशन नामक एका एनजीओने जून महिन्यात ऑनलाइन जॉब देणाऱ्या पोर्टलवरुन मेडिकल रिसर्च करण्यासाठी महिला उमेदवार हवेत अशी जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहून केरळ, तामिळनाडू, पुणे आदी ठिकाणाहून सुमारे 10 तरुणी ठाण्यातील येऊर भागात जॉब करण्यासाठी आल्या होत्या. मात्र, ठाण्यात आल्यानंतर या तरुणींना कुठलेही रिसर्चचे काम न देता त्यांना मेडिटेशन आणि इतर ध्यानधारणा करण्यास भाग पाडण्यात येत होते (Thane Crime NGO).

इतकेच नव्हे, तर आमच्या रुममध्ये अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे लावण्यात आले होते, असा आरोप देखील या तरुणींनी केला आहे. दरम्यान, या तरुणींपैकी काहींनी जॉब सोडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सदर एनजीओच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याचे देखील या तरुणींनी सांगितले.

या घटनेची माहिती एका पीडित तरुणीने भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांना दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी वर्तकनगर पोलिसांच्या मदतीने या तरुणींची सुटका केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम सुरु होते. या तरुणींना अशा प्रकारे जॉबचे आमिष दाखवून एका खोलीत का ठेवण्यात आले होते? तसेच, त्यांना मेडिकल रिसर्चचे काम न देता या तरुणींना मेडिटेशन करण्यास का भाग पाडण्यात येत होते? या तरुणींच्या खोलीत छुपे कॅमेरे का लावण्यात आले होते? या सगळ्या बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली.

Thane Crime NGO

संबंधित बातम्या :

नागपुरात ऑनलाईन देहविक्रीचा व्यवसाय, दोघांना अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

भांडणाची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाची गळा चिरुन हत्या, 5 आरोपींना अटक

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.