AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेकडून पर्दाफाश

ठाणे महापौर बंगल्याला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याचा पर्दाफाश मनसेनं केला आहे.(Thane Hukka Parlor Working in Covid Situation)

ठाण्यात महापौर बंगल्याशेजारच्या हॉटेलमध्ये हुक्का पार्लर, मनसेकडून पर्दाफाश
| Updated on: Sep 18, 2020 | 9:47 PM
Share

ठाणे : कोरोना काळातही ठाण्यात सर्रास हुक्का पार्लर सुरु आहेत. ठाण्यातील उपवन परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे सोशल डिस्टन्सिंग आणि महामारी काळामुळे अनेक वैध व्यवसाय बंद पडले आहेत. तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पण अवैध व्यवसायांना हे लागू पडत नाही, असंच दिसतं आहे. तर दुसरीकडे मंदिरं बंद असतानाही हुक्का पार्लर चालू असल्याचे मनसेने उघड केले आहे. (Thane Hukka Parlor Working in Covid Situation)

ठाण्यातील उपवन परिसरात ठाणे महापौर बंगल्याला लागून असलेल्या एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. मनसेचे स्वप्निल महिंद्रकर यांनी या हुक्का पार्लरमध्ये सुरु असलेला सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. ज्यामुळे ठाण्यात कोरोना काळातही सर्रास हुक्का पार्लर सुरु आहेत, हे समोर आलं आहे.

ठाण्यातील उपवन परिसरातील कॅफे कोयला असं या हुक्का पार्लरच नाव आहे. या हुक्का पार्लरमध्ये अनेक तरुण-तरुणी हुक्का ओढताना दिसत आहे. या हुक्का पार्लरमध्ये हुक्क्यासोबतच अनेक नशेचे पदार्थही मिळतात. यात हुक्का पार्लरवर राजकीय वरदहस्त असल्याची शंकाही मनसेकडून उपस्थितीत केली जात आहे.

एकीकडे मंदिरे बंद आहेत. अनेक वैध व्यावसायिकांना नियमांमुळे त्यांचे व्यवसाय सुरु करता येत नाहीत. ठाण्यात हुक्का पार्लर कोणाच्या वरदहस्ताने सुरु आहे, हे उघड झालचं पाहिजे, अशी मागणी मनसेने केली आहे.  (Thane Hukka Parlor Working in Covid Situation)

संबंधित बातम्या : 

पनवेल आरटीओला लॉकडाऊनचा फटका, उत्पन्नात 130 कोटींची घट

फ्लॉवर 120, कोथिंबीर 100 तर टोमॅटो 80 रुपये किलो, नागपुरात भाजीपाल्याचे दर गगनाला

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.