Lockdown : ठाणे पोलिसांची गांधीगिरी, मॉर्निंग वॉक करणाऱ्या आगाऊ नागरिकांची भर चौकात आरती

राज्यात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळे आता या आगाऊ नागरिकांना धडा शिवकण्यासाठी पोलिसांनी नवनवीन शक्कल लढवाव्या लागत आहेत.

Lockdown : ठाणे पोलिसांची गांधीगिरी, मॉर्निंग वॉक करणाऱ्या आगाऊ नागरिकांची भर चौकात आरती
Follow us
| Updated on: Apr 21, 2020 | 10:56 AM

ठाणे : ठाणे पोलिसांनी लॉकडाऊन तोडणाऱ्या नागरिकांची आरती करुन (Thane Police Gandhigiri) त्यांना धडा शिकवण्यात आला. पोलिसांनी गांधीगिरी करत या नागरिकांची भर चौकात आरती ओवाळली. लॉकडाऊनचं उल्लंघन करु नका असं वारंवार सांगूनही काही नागरिक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. राज्यात कोरोनाचा (Corona Virus) धोका वाढत चालला आहे. त्यामुळे आता या आगाऊ नागरिकांना धडा शिवकण्यासाठी पोलिसांनी नवनवीन (Thane Police Gandhigiri) शक्कल लढवाव्या लागत आहेत.

ठाण्यात सध्या कोरोनाचे 154 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरीही काही नागरिक कोरोना विषाणूच्या संकटाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे, की त्यांनी घरात राहावं. घराबाहेर पडू नका. पण तरीही रोज काही नागरिक मुद्दाम विनाकारण घराबाहेर पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता पोलीसही या आगाऊ नागरिकांना धडा शिकवण्यासाठी वेगवेगळे दंड देत आहेत.

पुण्यात मिशन ‘ऑल आऊट’

पुण्यातही लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र मॉर्निंग वॉक करणाऱ्या पुणेकरांच्या डोक्यात ही बाब शिरत नसल्याचं दिसतं. त्यामुळे पुणे पोलिसांनी मिशन ‘ऑल आऊट’ हाती घेतलं आहे. मॉर्निंक वॉकच्या नावाखाली बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना शिक्षा देऊन घरी पिटाळण्याचं काम पोलीस करत आहेत. पुण्यात लॉक डाऊन तोडून मोकाट फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई सुरुच आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात 60 ते 80 नागरिकांवर कारवाई (Thane Police Gandhigiri) करण्यात आली. मॉर्निंग वॉक आणि भाजीपाला आणण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचा यामध्ये समावेश होता.

जगात कोरोनाचं थैमान

कोरोना विषाणूने जगभरात एकच थैमान घातलं आहे. संपूर्ण जगात या कोरोनाने अनेकांना ग्रासलं आहे तर अनेकांचा बळीही घेतला आहे. त्यामुळे जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्रांनीदेखील त्यांच्या देशात संपूर्ण लॉकडाऊन केलं आहे. भारतातही आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर अंकूश ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 3 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. राज्यातही लॉकडाऊन आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या 4,666 कोरोना रुग्ण आहेत. तर 232 जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे. राज्यात संपूर्ण संचारबंदी असूनही कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे.

Thane Police Gandhigiri

संबंधित बातम्या :

Corona Update | मुंबईतील कोरोनाचा आकडा 3032 वर, राज्यात 4666 रुग्ण

लॉकडाऊनच्या काळात 242 सायबर गुन्हे दाखल, तर 47 आरोपींना अटक

दक्षिण सुदानमध्ये उपराष्ट्रपती 5 मात्र व्हेंटिलेटर 3, आफ्रिका खंडातील 41 देशात जेमतेम 2 हजार व्हेंटिलेटर्स

Corona Update : देशभरात 2546 रुग्णांची कोरोनावर मात, गेल्या 24 तासात 1553 नवे बाधित

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.