AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘झिरो बजेट शेती’ ही महाराष्ट्रातील संकल्पना, आता पुन्हा नैसर्गिक शेतीची गरज

सेंद्रिय शेतीची चर्चा सुरु होत आहे. (organic farming ) सेंद्रीय शेती म्हणजेच 'झिरो बजेट शेती' ही मूळची संकल्पना महाराष्ट्रातील आहे. याच पध्दतीच्या शेती व्यवसायाची गरज आज निर्माण झाली आहे. या शेतीची सुरवात विदर्भातील बेलोरा गावच्या सुभाष पालेकर यांनी केली होती. त्यांचा उद्देश आणि जाणून घेऊ या सर्वकाही..

'झिरो बजेट शेती' ही महाराष्ट्रातील संकल्पना, आता पुन्हा नैसर्गिक शेतीची गरज
'झिरो बजेट शेती' ची संकल्पना राबवणारे सुभाष पालेकर
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 4:13 PM

मुंबई : काळाच्या ओघात शेती व्यवसयात अमूलाग्र बदल झाला आहे. या बदलाबरोबरच (Use of chemical fertilizers) रासायनिक खतांचा वापर तर वाढलाच आहे शिवाय या खतामुळे वेगवेगळे आजारही जडू लागलेले आहेत. उत्पादनात वाढ झाली पण ज्यासाठी हे सर्व सुरु आहे त्याच आरोग्याची हेळसांड या बदल्या शेती पध्दतीने झाली आहे. त्यामुळे पुन्हा  सेंद्रिय शेतीची चर्चा सुरु होत आहे. (organic farming ) सेंद्रीय शेती म्हणजेच ‘झिरो बजेट शेती’ ही मूळची संकल्पना महाराष्ट्रातील आहे. याच पध्दतीच्या शेती व्यवसायाची गरज आज निर्माण झाली आहे. या शेतीची सुरवात विदर्भातील बेलोरा गावच्या सुभाष पालेकर यांनी केली होती. त्यांचा उद्देश आणि जाणून घेऊ या सर्वकाही..

सेंद्रिय शेती ही केवळ आता नावापुरतीच उरलेली आहे. उत्पादन वाढीच्या अनुशंगाने रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याचा विपरीत परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे पुन्हा जुन्या पध्दतीने शेती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणजेच सेंद्रिय शेतीपध्दतीने मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. कृषीतज्ञही याबाबतीत सहमत असून वाढत असलेला रासायनिक खतांचा मारा हा धोकादायक आहे. अशीच स्थिती राहिली तर नैसर्गिक शेती म्हणजेच झिरो बजेट शेती हाच पर्याय उरणार आहे.

तर ‘झिरो बजेट शेती’ची मूळ संकल्पनाच विदर्भातील सुभाष पालेकर यांची आहे. त्यांनी केलेल्या या शेतीपध्दतीची पुन्हा गरज निर्माण होत आहे. त्यांनी देशी गाईच्या शेनावर आणि गोमूत्रावर शेती केली होती. याकरिता ना खातांचा वापर, ना अत्याधुनिक पध्दतीने सिंचनाची सोय. या नैसर्गिक शेतीची चर्चा आता सबंध देशभर झालेली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार, शून्य बजेट नैसर्गिक शेतीअंतर्गत आतापर्यंत 4.09 लाख हेक्टर क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे

‘झिरो बजेट शेती’ करणारे पालेकर आहेत तरी कोण ?

सुभाष पालेकर यांचा जन्म १९४९ मध्ये विदर्भातील बेलोरा गावात झाला. त्यांनी नागपूरमधून शेतीत पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी 1972 मध्ये आपल्या वडिलांबरोबर रासायनिक शेती करण्यास सुरुवात केली. रासायनिक शेतीमधून उत्पादन तर भरघोस मिळायचे पण खताचा वापर यामुळे शेत जमिनीचा दर्जा निकृष्ट होत चालला. खताच्या वापरामुळे जमिनीचा कसच कमी होत आहे निदर्शास आल्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेतीबद्दल अभ्यास करण्यात सुरवात केली. तीन वर्षे अभ्यास केल्यानंतर कृषी तज्ञान हे खोट्या तत्वावर आधारित असल्याचा त्यांनी निकष काढला. आणि याला पर्यायी शेती म्हणून नैसर्गिक शेतीचा उगम झाला.

नैसर्गिक शेतीचे फायदे

रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन म्हणजे विषयुक्त अन्नाचा आपण पुरवठा करीत आहोत. हे बंद करायचे असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय पर्यायच नाही. नैसर्गिक शेतीमुळे कोणतेही आजार उद्भवत नाहीत. एकदा जर का सेंद्रिय शेतीतील अन्नाची सवय झाली तर पुन्हा कोणी रासायनिक खताचा वापर करणार नाही असा विश्वास सुभाष पालेकर यांना आहे. नैसर्गिक शेती करिता केवळ एका गाईची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 3 एकरातील जमिनीची जोपासना करण्यासाठी केवळ एका देशी गाईचे गोमूत्र आणि शेण आवश्यक असल्याचेही पालेकर म्हणाला आहेत. ‘झिरो बजेट शेती’ शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्याही रोखता येणार नाहीत. कारण रासायनिक खतावर होत असलेला खर्च आणि प्रत्यक्षात उत्पादन याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. (The concept of ‘zero budget farming’ is in Maharashtra, again the need for this new farming system)

संबंधित बातम्या :

सोयाबीन दराचा परिणाम बाजारपेठेवर ; आवकही घटली

शेवटचे दोन दिवस, 90 लाख शेतकऱ्यांनी केली ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणी

पावसानंतर कपाशीवर किडीचा प्रादुर्भाव, काय आहे उपाययोजना ?

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.