जमीन ठोठावत होती, खोदकाम सुरु झालं, समोरचं दृश्य पाहून अख्खं गावं हादरलं… 106 मानवी सांगाडे अन्…

एका शेतकऱ्याला खोदकाम करताना काही तरी वाईट दिसले. त्याने प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला कळवले. एएसआयने उत्खनन सुरू केले. त्यानंतर अशा काही गोष्टी समोर आल्या की समोरचे हादरून गेले.

जमीन ठोठावत होती, खोदकाम सुरु झालं, समोरचं दृश्य पाहून अख्खं गावं हादरलं... 106 मानवी सांगाडे अन्...
Sinauli VillageImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 11:14 PM

उत्तर प्रदेश | 21 फेब्रुवारी 2024 : बागपत येथील गावातील शेतकरी प्रभा शर्मा आपल्या शेतात शेती करत होते. अचानक त्यांना जमिनीतून कोणतरी ठोठावत आहे असा भास झाला. त्यांनी गावातल्या लोकांना कळवले. गावकऱ्यांनी मिळून खोदकाम सुरु केले. यावेळी त्यांना समोर जे काही दिसले त्याने ते हादरले. एक दोन नव्हे तर तब्बल 106 मानवी सांगाडे त्यांना दिसले. त्यांनी तत्काळ प्रशासनाकडे धाव घेतली. प्रशासनाने पुरातत्व खात्याला कळविले आणि सुरु झाले त्या जागेचे सर्वेक्षण. पुरातत्व खात्याने तिथे खोदकाम सुरु केले. त्यातून आणखी काही वस्तू जमिनीतून बाहेर येत होत्या.

यमुना नदीपासून 8 किमी अंतरावर सिनौली गाव आहे. या गावातच ही घटना घडलीय. सिनौली गाव सुमारे 4,000 बिघामध्ये पसरले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 11 हजार. त्यात जाटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तर ब्राह्मण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय दलित आणि मुस्लिम कुटुंबेही या गावात आहेत.

शेतकरी प्रभा शर्मा यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय पुरातत्व खात्याच्या टीमने त्या शेतात उत्खनन सुरु केले. टीमने आधी 106 मानवी सांगाडे सापडले. त्यांची कार्बन डेटिंग केली असता हे सांगाडे 3,000 वर्षांहून अधिक जुने असल्याचे आढळून आले. आणखी उत्खनन केले असता तिसऱ्या टप्प्यात त्या टीमला मोठे यश मिळाले. यामध्ये अनेक अद्भुत गोष्टी पाहायला मिळाल्या.

सिनौलीच्या उत्खननात काय सापडले?

उत्खनन केलेल्या शेतामध्ये आठ कबरी सापडल्या. त्यात हे मानवी सांगाडे होते. त्या सांगाड्याखाली शस्त्रे, चैनीच्या वस्तू, भांडी, प्राणी, पक्षी यांचे सांगाडे सापडले. आणखी खोदकाम केले असता मृतदेहांसोबत पुरलेले तीन रथ सापडले. या सर्व वस्तू 4,000 वर्षांहून अधिक जुन्या भारताच्या विकसित संस्कृतीचे प्रतिबिंब आहे असे पुरातत्व खात्याने सांगितले. या जमिनीतून सुमारे 4,000 वर्षे जुनी अँटेना तलवार आणि तांब्याचे चिलखतही सापडले.

इतिहासाला आव्हान देणारे पुरावे

सिनौलीमध्ये सापडलेले पुरावे हे ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास बदलण्यासाठी पुरेसा आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्या जमिनीतून सापडलेल्या 4,000 वर्ष जुना रथ, अँटेना तलवार, शवपेटी अशा काही खास गोष्टी सापडल्या. त्या कोणत्याही उत्खननाच्या ठिकाणी सापडल्या नाहीत. सिनौलीची संस्कृती नंतरच्या वैदिक कालखंडातील आणि हडप्पा संस्कृतीमधील संस्कृतीशी संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर, स्थानिक लोक याचा संबध महाभारत काळाशी जोडत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.